Ajay Kholkar challenge to Viresh Borkar Dainik Gomantak
गोवा

नेड्डा, सिल्पाबाबतच्‍या 'अधिकृत नोंदी' नाकारा! अजय खोलकरांचे बोरकरांना आव्‍हान

Ajay Kholkar challenge to Viresh Borkar: नेवरा येथील ‘नेड्डा’ आणि ‘सिल्पा’ स्लूस गेट्स (पाणी नियंत्रण दरवाजे) सरकारी नोंदीनुसार आमदार वीरेश बोरकर यांचे बंधू साईश बोरकर यांच्‍या मालकीचे असल्‍याचे दिसून येतात.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: नेवरा येथील ‘नेड्डा’ आणि ‘सिल्पा’ स्लूस गेट्स (पाणी नियंत्रण दरवाजे) सरकारी नोंदीनुसार आमदार वीरेश बोरकर यांचे बंधू साईश बोरकर यांच्‍या मालकीचे असल्‍याचे दिसून येतात. तरीही आमदार बोरकर नकार देत असतील, तर यांनी याबाबतच्‍या अधिकृत नोंदी नाकाराव्‍यात, असे आव्हान रिव्‍होल्‍युशनरी गोवन्‍स पक्षाच्‍या (आरजी) मनोज परब गटाचे नेते अजय खोलकर यांनी सोमवारी दिले.

आमदार वीरेश बोरकर यांनी काहीच दिवसांपूर्वी बोलताना, आपल्या भावाच्या मालकीचे कोणतेही स्लूस गेट्स नसल्याचे विधान केले होते. त्‍याला उत्तर देताना, राज्‍य विधानसभेत सादर केलेली आणि मंजूर झालेली कागदपत्रे तसेच तिसवाडीच्या मामलेदार कार्यालयातील नोंदींनुसार नेवरा येथील ‘नेड्डा’ आणि ‘सिल्पा’ स्लूस गेट्स हे साईश बोरकर यांच्या मालकीचे असल्याचे दिसून येते.

हे व्यवहार १०.२५ लाख रुपयांच्‍या मोबदल्यात झाल्याचे नमूद आहे. तरीही आमदार बोरकर आपल्‍या भावाच्या मालकीचे कोणतेही स्लूस गेट्स नाहीत, असा दावा करीत आहेत. त्‍यामुळे त्‍यांनी अधिकृत कागदपत्रांमधील नोंदी स्पष्टपणे नाकारणे गरजेचे आहे, असे खोलकर म्‍हणाले.

त्यांनी नेमके स्‍पष्‍टीकरण द्यावे!

केवळ सरसकट नकार देण्याऐवजी वीरेश बोरकर यांनी या अधिकृत कागदपत्रांमध्ये नेमके काय नमूद केले आहे? तसेच साईश बोरकर यांचा ‘नेड्डा’ व ‘सिल्पा’ स्लूस गेट्सशी काय संबंध आहे? यावर स्‍पष्‍टीकरण देणे गरजेचे आहे, असेही खोलकर यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission Updates: सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा? वर्षातून दोनऐवजी 4 वेळा डीए वाढवण्याचा नवा प्रस्ताव; 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी घडामोड

Britain To Goa Flights: ब्रिटनमधून गोव्यात विमानफेऱ्यांत वाढ, 'टीयूआय'च्या पाच थेट फेऱ्या; 32,000 विमान आसने उपलब्ध

Mapusa Sexual Assault Case: विकृत प्रवृत्ती ठेचून काढा! म्हापसा अत्याचारप्रकरणी मुख्‍यमंत्र्यांचे कठोर कारवाईचे आदेश

Rohit Sharma World Record: 400 Sixer... फक्त 'इतके' षटकार आणि रोहित शर्माच्या नावावर ऐतिहासिक विश्वविक्रम! वनडे क्रिकेटमध्ये घडणार नवा इतिहास

Steel Factory Blast: '...अन् काही सेकंदातच राख झाली', स्टील कारखान्यात भीषण स्फोट; 16 कामगारांचा जागीच मृत्यू VIDEO

SCROLL FOR NEXT