Netravali Wildlife Sanctuary Dainik Gomantak
गोवा

Netravali Wildlife Sanctuary: 7 किमीसाठी कापावे लागणार तब्‍बल 70 किलोमीटरचे अंतर

नियोजनाचा अभाव : धारगिणीतील फाटकांची डोकेदुखी

दैनिक गोमन्तक

नेत्रावळी अभयारण्य क्षेत्रात येणाऱ्या धारगिणी, भाटी-सांगे येथील जुना गावात जाणाऱ्या रस्त्यावर वन खात्याने दोन फाटके बसविल्याने नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

आता तर चारचाकी वाहनचालकांनाही प्रवेश नाकारला जात असल्यामुळे मोठी समस्‍या उभी ठाकली आहे. सात किलोमीटर अंतर तब्‍बल सत्तर किलोमीटर एवढे कापावे लागणार आहे.

धारगिणी-भाटी येथील अभयारण्य क्षेत्रात राज्‍यातील शेवटचा जुना गाव आहे. त्यापुढे कर्नाटकची सीमा सुरू होते. डिग्गी जोयडा येथील श्री गवळादेवीची जत्रा ही फार प्रसिद्ध आहे.

याच रस्त्यावरून हजारो भाविक शेकडो वाहने घेऊन या जत्रेसाठी जात असतात. पण आता जुना गावात जाण्यासाठी चारचाकी वाहनावर निर्बंध घालण्यात आल्याने लोकांना मन:स्‍ताप सहन करावा लागत आहे.

याच मार्गांवर दोन फाटके बसविण्यात आली आहेत. एक मुख्य रस्त्यावर आणि एक मुख्य रस्त्यापासून तीन किलोमीटर अंतरावर.

आता जर कोणाला जुनामार्गे गवळादेवीच्या दर्शनाला जायचे असेल तर आपली वाहने पहिल्या फाटकावर थांबवून तीन किलोमीटर अंतर चालत दुसऱ्या फाटकावर असलेल्या वन खात्याच्या कर्मचाऱ्यांकडून परवानगी घ्यावी लागते.

आणि परवानगी मिळाली नाही तर पुन्‍हा चालत माघारी यावे लागते. त्यामुळे दोन्ही फाटकांवर कर्मचारी असणे आवश्यक आहे.

मानवता श्रेष्‍ठ की वन्‍य कायदा?

अचानक एखाद्या रुग्‍णाला इस्‍पितळात न्‍यावे लागले तर चारचाकी घेऊन जुना, डिग्गी, बाजारकुणग, केसरलॉक, अनमोड, मोले, कुळेमार्गे कुडचडे असा प्रवास करावा लागेल.

याचाच अर्थ जुना ते सांगे अवघे सात किलोमीटरचे अंतर वन खात्याच्या निर्णयामुळे तब्‍बल सत्तर किलोमीटर कापावे लागणार आहे. हे मानवतेच्या दृष्टीने योग्य की वन्‍य कायदा योग्य? हे तपासून पाहण्याची वेळ आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT