Fraud|Scam|Corruption  Canva
गोवा

Netravali Panchayat: गटार बांधण्याच्या नावावर लाखो रुपयांचा भ्रष्टाचार; नेत्रावळीच्या पंचाचे सरपंचांवर गंभीर आरोप

Netravali: मला न बोलावता सरपंचाला पोलिस निरीक्षक यांच्याकडून ‘क्लीन चीट’ देण्यात आली, असा आरोप नेत्रावळीच्या पंच सदस्य राखी नाईक यांनी केला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: नेत्रावळी पंचायतीचे सरपंच बुंदा वरक यांनी कागदावर काम केल्याचे दाखवून काम पूर्ण झाले असे प्रमाणपत्र जारी केले, परंतु हे काम झालेच नसल्याचे पुरावे मी पंचायतीच्या पाक्षिक बैठकीत सादर केल्यानंतर ‘तू माझ्या वाट्याला येऊ नको’ अशी धमकी त्यांनी मला दिली. त्यानंतर मी पोलिस स्थानकात तक्रार केली. मात्र, मला न बोलावता सरपंचाला पोलिस निरीक्षक प्रवीण गावस यांच्याकडून ‘क्लीन चीट’ देण्यात आली, असा आरोप नेत्रावळीच्या पंच सदस्य राखी नाईक यांनी केला आहे.

तृणमूल काँग्रेसच्या पणजी येथील कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत राखी नाईक यांनी पंचायतीवर आरोप केले. त्यांनी सांगितले, की पंचायत काम न करताच काम केल्याचे प्रमाणपत्र जाहीर करते. पंचायतीने गटार बांधण्याच्या नावावर लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. नेत्रावळी पंचायतीचे सरपंच बुंदा वरक यांनी हा घोटाळा केल्याची माहिती मी संबंधित कार्यालयाला दिली आहे. मात्र, त्यांच्याविरुद्ध अजून काहीच कारवाई होत नाही.

या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप आहे का असे विचारले असता, नाईक यांनी सांगितले की, जर राजकीय हस्तक्षेप नसता तर आज पारदर्शक आणि कायदेशीर कारवाई पोलिसांनी केली असती. स्थानिक आमदार तथा मंत्री सुभाष फळदेसाई हे स्वतः प्रकल्पाचे उद्‌घाटन करतात. ते पूर्ण झाल्यावर त्याचे लोकार्पण होत नाही. मात्र, ते पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र जारी करून रक्कम कंत्राटदाराला दिली जाते.

सरपंचाच्या पत्नीच्या खात्यात पैसे!

गटविकास अधिकारी आणि पंचायत संचालनालयात पंचायतीत सुरू असलेल्या घोटाळ्यासंदर्भात तक्रार केली आहे. मात्र, अजून कोणतीच कारवाई झाली नाही. पंचायतीत सुरू असलेला घोटाळा हा गंभीर आहे आणि त्याची दखल घ्यायलाच हवी. प्रधानमंत्री सिंचाई योजनेअंतर्गत पंचायतीने २.५ कोटी रुपयांची कामे केल्याचे दाखविले आणि पैसेही घेतले. हे पैसे सरपंचाच्या पत्नी आणि त्यांच्या मर्जीतल्या लोकांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती देखील मी दिल्याचे राखी नाईक यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: नशिबाची तगडी लॉटरी, गरिबी कायमची मिटणार! 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं भाग्य; बुध-मंगळाचा मोठा चमत्कार

Kharivada: खारीवाडा जेटीच्या दुरुस्तीचे आदेश; आमदार साळकर यांच्याकडून पाहणी; मासेमारी हंगामापूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना

RBI Alert: 200, 500 रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयकडून अलर्ट जारी, बाजारपेठेत नकली नोटांचा सुळसुळाट; वेळीच सावध व्हा!

Dharbandora Health Centre: कुळे-शिगावला मिळणार 24 तास सेवा; आपत्कालीन 'आरोग्य सेवा केंद्र' सुरू, सभापती गावकर यांच्या हस्ते उद्‌घाटन

India vs England 2nd T20: संजू सॅमसन अन्‌ तिलक वर्माची फलंदाजी रडारवर; वैभवला संधी मिळणार?

SCROLL FOR NEXT