Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: आयआयटी प्रकल्प उभारण्यापूर्वी धारबांदोडावासियांना विश्वासात घेण्याची आवश्यकता- पाऊसकर

या जागेत स्थानिकांच्या काजू बागायती मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे स्थानिकांचा विचार करण्याची गरज आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

देवसडा धारबांदोडा येथे असलेल्या 12 लाख चौरस मीटर जागेत आयआयटी प्रकल्प उभारण्यासाठी 2017 साली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे प्रस्ताव दिला होता. त्यानुसार त्यावेळी परिसरात सर्वेक्षण करण्यात आले होते. परंतु सरकारने प्रकल्प शेळ - मेळावली येथे नेण्याचा निर्णय घेतल्याने प्रस्तावावर विचार केला नव्हता.

आयआयटी प्रकल्प उभारल्यास धारबांदोडा तालुका शैक्षिणक हब म्हणून नावलौकिक मिळवू शकतो. परंतु प्रकल्प उभारण्यापूर्वी सरकारने स्थानिक लोकांना विश्वासात घेण्याची आवश्यकता असल्याचे मत माजी बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी व्यक्त केले आहे.

दाबाळ येथे गाडवंस जल्मी ब्राह्मणी बालसती या मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुमारे दीड रुपये खर्च करून बांधलेल्या स्वागत द्वाराच्या उद्घाटन प्रसंगी माजी बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर बोलत होते.

सदर स्वागत द्वार स्थानिक पंच रमाकांत गावकर व भोला गावकर यांनी स्वखर्चाने बांधण्यात आले आहे. यावेळी प्रतिभा तेंडुलकर, सावर्डेचे माजी सरपंच संदीप पाऊसकर, पंच रमाकांत गावकर, भोला गावकर, भालचंद्र नाईक, सिध्दी पाऊसकर व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

धारबांदोडा येथील सरकारी जागेत आयआयटी उभारल्यास परिसराचा विकास अधिक प्रमाणात होणार आहे. परंतु प्रकल्प उभारण्यासाठी सरकारने स्थानिकांना विश्वासात घेण्याची अत्यंत गरज आहे. कारण स्थानिक लोकांच्या काजू बागायती मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे स्थानिकांचा विचार प्रथम करण्याची गरज आहे. पंच सदस्य रमाकांत गावकर व भोला गावकर यांनी समाजासाठी अनेक उपक्रम राबविले आहे. त्याचा लाभ स्थानिकांना मिळत असल्याचे दीपक पाऊसकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT