Jit Arolkar in Pernem
Jit Arolkar in Pernem Dainik Gomantak
गोवा

Jit Arolkar: लढ्यासाठी एकत्र येणे गरजेचे; जीत आरोलकर

दैनिक गोमन्तक

Jit Arolkar in Pernem: ‘कूळ-मुंडकारांचा हक्क’ हा पेडणे तालुक्यातील बहुजन समाजाचा महत्वाचा प्रश्न असून तालुक्यातील सर्व राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे एकाच व्यासपीठावर येऊन लढण्याची आवश्यकता आहे, असे मत आवाहन मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी तुये येथील कूळ मुंडकार जनजागृती कार्यक्रमात केले.

पेडणे तालुक्यातील कूळ-मुंडकारांवर झालेल्या अन्यायाबाबत जनजागृती करण्यासाठी आरोलकर यांच्या नेतृत्वाखाली तुये येथील ग्राम पंचायत सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

यावेळी जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशांवकर, तुयेच्या सरपंच सुलक्षणा नाईक, प्रवीण कळंगुटकर, माजी आमदार परशुराम कोटकर, तारा हडफडकर, ॲड. प्रसाद शहापुरकर, धारगळचे सरपंच अर्जुन कानोळकर, दयानंद मांद्रेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

आरोलकर म्हणाले, पेडणे तालुक्यात साकारलेल्या मनोहर आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळामुळे पेडणेतील जमिनीला महत्त्व प्राप्त झाले आहे. कुळांना विश्वासात न घेताच भाटकार परस्पर जमीन विकत आहेत.

त्यामुळे कूळ आणि मुंडकारांवर अन्याय होत आहे. त्यासाठीच हा सर्वपक्षीय लढा उभारला असून मुख्यमंत्री सावंत यांचे सहकार्य आहे. सूत्रसंचालन दयानंद मांद्रेकर यांनी केले.

खटल्यांसाठी 6 वकील

कुळ-मुंडकारांचे खटले मोफत लढवण्यासाठी सहा वकिलांची नियुक्ती केली असून सदर खटले लढवण्यासाठी नागरिकांना मोफत वकील मिळणार आहेत.

यासाठी आमदार जीत आरोलकर यांनी पुढाकार घेतला असून लोकांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच हा लढा यशस्वी करण्यासाठी लवकरच एका समितीची स्थापना करण्यात येणार आहे,असे सांगण्यात आले.

कसत असल्याचा पुरावा हवा

आपण जमिनीची पावती किंवा तोंडी संमतीने जमीन कसत असल्याच्या पुराव्यानुसार कूळ म्हणून दावा करू शकतो किंवा १९६२ पासून जर जमिनीवर एखाद्याचा कब्जा असेल, तर तो त्यास पात्र ठरतो,असे ॲड. प्रसाद शहापुरकर यांनी सांगितले.भास्कर नारूलकर यांनी उप

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT