Need organize women in the Bhandari community: Shubhangi Wayangankar 
गोवा

भंडारी समाजातील महिलांचे संघटन करणार: शुभांगी वायंगणकर

गोमंतक वृत्तसंस्था

म्हापसा: आगामी एक वर्षाच्या काळात भंडारी समाजातील महिलांचे संघटन करण्यावर भर दिला जाईल, असे गोमंतक भंडारी समाजाच्या महिला विभागाच्या नवनिर्वाचित अध्यक्ष असलेल्या म्हापसाच्या माजी नगरसेवक शुभांगी गुरुदास वायंगणकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले. त्या भाजपा महिला मोर्चाच्या माजी अध्यक्ष आहेत.

केंद्रीय समितीच्या मार्गदर्शनाखाली गोव्यातील बाराही तालुक्यांत महिला समित्यांची पुनर्रचना करण्यात येईल, असे नमूद करून सौ. वायंगणकर म्हणाल्या, गेल्या सहा वर्षांपूर्वी महिला समितीच्या अध्यक्षपदी माझी निवड झाल्यानंतर वर्षभराच्या आत सर्व तालुक्यांत महिला संघटना उभारल्या होत्या व त्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नियमित कार्यक्रमांबरोबच छोटेखानी महिला मेळावा, वधु-वर मेळावा, हळदीकुंकू समारंभ, महिलांसाठी विविध स्पर्धा, महिलावर्गाला सदस्यता मोहिमेत सहभागी करून घेणे, गोरगरिबांना साहाय्यभूत ठरावे यासाठी ओबीसी प्रमाणपत्रे मिळवून देण्यासंदर्भात गरजूंना मार्गदर्शन तथा सहकार्य करणे, सर्व तालुक्यांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाव्यात यासाठी महिला विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करणे इत्यादी उपक्रम आतापर्यंत राबवण्यात आले असून, यापुढेही अशाच स्वरूपाचे कार्य केले जाईल.

शुभांगी वायंगणकर या गेल्या सुमारे सहा वर्षांपासून समाजाच्या महिला विभागाच्या अध्यक्ष या नात्याने कार्यरत आहेत. वर्ष २०१२ मध्ये अनिल होबळे यांची समाजाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सौ. वायंगणकर यांची महिला विभागाच्या अध्यक्षपदी वर्ष २०१४ मध्ये निवड करण्यात आली होती व तेव्हापासून त्या या विभागाच्या अध्यक्षपदी सलगपणे कार्यरत आहेत. सुमारे दोन वर्षांपूर्वी समाजाच्या केंद्रीय समितीच्या अध्यक्षपदी अशोक नाईक यांची तीन वर्षांच्या आगामी कार्यकाळासाठी अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती; तथापि, काही कारणांस्तव महिला विभागाची पुनर्रचना करण्याबाबत विलंब झाला होता. त्यामुळे आता यापुढे सौ. वायंगणकर यांच्याकडे केवळ एक वर्षांचा कार्यकाळ बाकी आहे. वर्ष २०१४ मध्ये या ज्ञातिसंस्थेच्या अध्यक्षपदी अनिल होबळे असताना आयोजित करण्यात आलेल्या समाजाच्या शतकपूर्ती सोहळयास सुमारे तीस हजार समाजबांधवांची उपस्थिती लाभली होती व त्या कार्यक्रमाच्या संजोजनामध्ये शुभांगी वायंगणकर यांचा सिंहाचा वाटा होता. गोव्यातील विविध भागांत बैठका घेऊन यानिमित्ताने त्यांनी प्रचारकार्य केले होते. यासंदर्भात विचारणा केली असता सौ. वायंगणकर म्हणाल्या की या ज्ञातिसंस्थेच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळेच तसेच अन्य कार्यकर्त्यांमुळेच हे कार्य सिद्धीस नेणे शक्य होत असते.

यापूर्वी सुमारे तीन-चार वर्षांपूर्वी घेतलेल्या वधु-वर मेळाव्यात सुमारे सहाशे ते सातशे वधु-वरांचा तसेच पालकांचा सहभाग होता व त्याचा लाभ कित्येकांना झाला होता, असे नमूद करून अशाच स्वरूपाचा मेळावा आगामी वर्षभराच्या काळात आयोजित केला जाईल, अशी माहिती सौ. वायंगणकर यांनी दिली.सौ. वायंगणकर पुढे म्हणाल्या, की ओबीसीचा विषय ज्ञातिबांधवांपर्यत व्यापकतेने पोहोचवणे, इतर मागासवर्गीय समाजासाठी शासकीय पातळीवर असलेल्या सेवा-विविधा व योजनांबाबत जनजागृती करणे, कार्यकारिणीशी संपर्क साधणाऱ्या आर्थिकदृष्ट्या कमजोर वर्गातील व्यक्तींसाठी संस्थेच्या खर्चाने सामूहिक विवाह घडवून आणणे, भंडारी समाजाचे सदस्यत्व स्विकारण्यासाठी ज्ञातीतील महिलांना प्रोत्साहित करणे, असे उपक्रम हाती घेण्यात येतील, असेही त्या म्हणाल्या. गोमंतक भंडारी समाजाच्या महिला विभाग कार्यकारिणीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक लवकरच पणजी येथे समाजाच्या मध्यवर्ती कार्यालयात समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीत महिला विभागाच्या आगामी उपक्रमांसंदर्भात तसेच कार्यक्रमांसंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असेही सौ. वायंगणकर म्हणाल्या

‘सरकारने सर्व जातीसमूहांचे सर्वेक्षण करावे’ गोव्यास भंडारी समाजाची लोकसंख्या सुमारे आठ लाख असल्याचा आमचा अंदाज असला तरी शासकीय पातळीवर त्याबाबत यथायोग्य जनगणना झालेली नाही, असा दावा सौ. वायंगणकर यांनी केला. गेल्या सुमारे चार-पाच वर्षांपूर्वी राज्य सरकारने असे जातिनिहाय सर्वेक्षण करण्याचे आवाहन पंचायत सदस्यांना तसेच नगरसेवकांना केले होते. तथापि, ते लोकप्रतिनिधी विविध जातिसमूहांतील असल्याने तसेच ते राजकारणी असल्याने त्यांच्याकडू्न नि:पक्षपातीपणे सर्वेक्षणकार्य होईलच असे नाही. त्यामुळे त्या सर्वेक्षणात गांभीर्य राखण्याच्या दृष्टीने सरकारनेच ते काम हाती घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. या बाबतीत प्रत्येक जातिसंस्थेचे साहाय्य सरकारला घेता येईल, अशी सूचनाही त्यांनी केली. भारताच्या संसदेमध्येही इतर मागासवर्गीय समाजाचा विषय कित्येकदा येत असतो. त्यामुळे, हे सर्वेक्षण राज्य सरकारने प्राधान्यक्रमाने हाती घ्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT