Dainik Gomantak
गोवा

Goa Election: राष्ट्रवादी काँग्रेसला आठ जागांची अपेक्षा

गोव्यात आगामी निवडणुकीत (Election) काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी या पक्षात युती होणार आहे .

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोव्यात (Goa) आगामी निवडणुकीत (Election) काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी या पक्षात युती होणार असून राष्ट्रवादी पक्षाला काँग्रेसने किमान आठ जागा सोडाव्यात अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हे सध्या गोव्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आलेमाव यांनी ही माहिती दिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते एकमेकांना भेटले असून त्यांनी युती करण्यास मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले. नावेली मतदार संघातून यावेळी आपली कन्या वालांका आलेमाव या निवडणूक लढविणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.

नावेलीची जागा काँग्रेसला गेल्यास वालांका काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढविणार असे सांगितले. युती झाली नाही तरी गोव्यात निवडणूक लढविण्याची सर्व तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने केली असून युती न झाल्यास जास्तीत जास्त जागांवर उमेदवार उतरविण्याची पक्षाची तयारी आहे असे त्यांनी सांगितले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

माल हाताळणीत मुरगाव बंदराने देशात गाठली आघाडी, गतवर्षी सर्वाधिक 15.91 टक्के वाढ; सर्व बंदरावर वर्षभरात 915 दशलक्ष टन हाताळणी

Sexual Assault Case: लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार; आरोपीला चार दिवसांची पोलिस कोठडी

घोगळ येथे दारूच्या दुकानाला आग; अग्नीशमन दलाने मिळवले नियंत्रण, चार रेफ्रिजरेटर, दारूच्या बाटल्या तसेच इतर साहित्य जळून खाक

गोव्यातून कोकेन पुरवठा; कृती दलावर प्रश्नचिन्ह, तीन महिन्यांपूर्वी 'एएनटीएफ'ची स्थापना : अमलीपदार्थ तस्करीला आळा कधी बसणार?

खरी कुजबुज: निवडणुकीचा सक्सेस फॉर्म्युला!

SCROLL FOR NEXT