NCP and Shiv Sena proposes alliance with Congress in Goa

 

Dainik Gomantak

गोवा

दिगंबर कामत दिल्लीत; राष्ट्रवादी, शिवसेनेचा कॉंग्रेसला आघाडीचा प्रस्ताव

गोवा काँग्रेसचे जेष्ठ नेते दिगंबर कामत यांची दिल्लीतील बैठकीला उपस्थिती

दैनिक गोमन्तक

गोव्यातील निवडणुका (Goa Election)अवघ्या दोन महिन्यावर येवून ठेपल्या आहेत. पक्षांतराबरोबरच राष्ट्रीय पक्षांबरोबरच्या युतीलाही उधाण आले आहे. गोव्यात आम्ही स्वबळावर 22 जागा लढविण्याचे आश्वसन देणाऱ्या शिवसेना (Shivsena) पक्षाने कॉंग्रेसकडे (Congress) आज युतीचा प्रस्ताव ठेवला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी (NCP) या दोन्ही पक्षांनी काँग्रेसकडे युतीची मागणी केली आहे. आज गोवा काँग्रेसचे जेष्ठ नेते दिगंबर कामत (Digambar Kamat) दिल्लीतील बैठकीला उपस्थित राहणार आसून अद्याप या प्रस्तावावर निर्णय झालेला नाही. मात्र काही खलबतं होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. काँग्रेस हायकमांडने याबाबत अजून अंतिम होकार दिलेला नाही.

देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजू लागला आहे. यातच आता छोट्याशा गोव्यातही (Goa) राजकीय पक्षांनी आघाडी करत निवडणूकपूर्व आपली ताकद दाखविण्यासाठी तयारी सुरु केली आहे. दरम्यान शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलताना, 'तृणमुल कॉंग्रेसवर (Trinamool Congress) निशाणा साधला होता. आणि गोव्यातील लोकांची मानसिकता वेगळी आहे. तेव्हा गोव्यात युती करतांना आम्ही शंभरदा विचार करू, त्याचबरोबर गोव्यात पहिल्यांदाच तृणमुल कॉंग्रेस विधानसभा निवडणूक लढवत आहे. त्यांचे आम्ही गोव्यात स्वागत करतो. असे राऊत म्हणाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Love Horoscope: लग्नाचा विचार करताय? वृषभ राशीच्या लव्ह लाईफमध्ये येणार गोडवा, सुरुवातीचे 6 महिने टाळावा 'हा' मोठा निर्णय

"कधीच विराटला बोलावलं नाही, बोलावणारही नाही!", 'Koffee With Karan'मध्ये कोहलीला 'नो एन्ट्री'; करण जोहरचं धक्कादायक विधान

"गोव्यात हे चाललंय काय?", 450 रुपयांच्या टॅक्सी स्कॅममधून सुटलो, पोलिसांनी 500 रुपये घेतले; जर्मन इन्फ्लुएंसरचा Video Viral

7th Pay Commission Goa: सातवा वेतन आयोग लागू करा! गोव्यातील पंचायत कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Ratnagiri: 'समुद्रस्नान' जीवावर बेतलं!गणपतीपुळे समुद्रात तीन पर्यटक बुडाले; एकाचा मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश

SCROLL FOR NEXT