गोवा

Goa Illegal Resort Demolition: नाझरी रिसॉर्टचा बेकायदा भाग अजूनही जसाच्या तसा? डेस्मंड आल्वारिस यांचा गंभीर आरोप; कारवाई फक्त नावापुरतीच!

Nazri Resort Illegal Demolition: नाझरी रिसॉर्टचा बेकायदा असलेला संपूर्ण भाग पाडण्यात आलेला नाही.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: नाझरी रिसॉर्टचा बेकायदा असलेला संपूर्ण भाग पाडण्यात आलेला नाही. किरकोळ पाडकाम करून कारवाई झाल्याचा बनाव केला जात असल्याचा आरोप या प्रकरणातील मूळ याचिकादार डेस्मंड आल्वारिस यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना केला.

ते म्हणाले, ‘‘न्यायालयाच्या आदेशाचा आदर सरकारी यंत्रणेला नाही. आदेश देऊन वर्षे उलटली, तरी पाडकाम होत नव्हते. मला न्यायालयाचा अवमान झाल्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल करावी लागली. त्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाने आपण ३१ मेपूर्वी बेकायदा भाग पाडू, अशी हमी न्यायालयात दिली होती.

न्यायालयाला बेकायदा बांधकाम प्रकरणात आदेश देण्याची वेळच येऊ नये. सरकारी यंत्रणेकडे सर्व कागदपत्रे असतात. त्यांना बांधकाम कायदेशीर आहे की बेकायदा, हे लगेच समजते; मात्र कारवाई होत नाही.’’इतर प्रकरणांतही प्रशासन असेच मेहरबान झाल्याचा आरोप करून ते म्हणाले, ‘‘नाझरीचा बेकायदा भाग पाडण्याचे आदेश प्रथम राष्ट्रीय हरित लवादाने आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Art Exhibition: 'स्टिल/गोवा'मधून दिसणार गोव्याची अनोखी कहाणी; 1994 ते 2004 चा काळ छायाचित्रांतून जिवंत

Surya Gochar 2026: प्रेमसंबंधात गोडवा अन् करिअरसह व्यवसायात भरभराट! सूर्याचं धमाकेदार गोचर; 5 राशींचं उजळणार नशीब

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISIच्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

SCROLL FOR NEXT