Students writing exam
Students writing exam  Dainik Gomantak
गोवा

Valpoi School: 25 मुले महाराष्ट्रातील; नवोदय पात्रता परीक्षेत घोळ झाल्याचा पालकांचा आरोप

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi School

वाळपई नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीच्या वर्गात प्रवेश घेताना पात्रता परीक्षेत उत्तर गोव्याबाहेरील २५ मुले उत्तीर्ण झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याबाबत वाळपईत जिल्हाधिकारी, मामलेदार आणि नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांना पालकांनी निवेदन सादर केले आहे.

वाळपई नवोदय विद्यालयात फक्त उत्तर गोव्यासाठी असताना महाराष्ट्रातील २५ मुले कोणत्या निकषाद्वारे उत्तीर्ण झाली? यात मोठा घोटाळा झाल्याचा संशय पालकांनी व्यक्त असून यात गुंतलेल्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही पालकांनी केली आहे.

उत्तर गोव्यातून सहावीच्या वर्गात प्रवेशासाठी पात्रता चाचणी परीक्षेला एकूण ५०० मुले बसली होती, त्यात ८० मुले उत्तीर्ण झाली; पण त्यातील २५ मुले महाराष्ट्रातील आहेत. वाळपई नवोदयसाठी फक्त उत्तर गोव्यात वास्तव्य करणारीच मुले परीक्षा देऊ शकतात.

अनेक कठोर नियम असताना त्यांना बगल देऊन परीक्षा देता येत नाही. शिवाय उत्तर गोव्यातील विद्यार्थी दक्षिण गोव्यात, तर दक्षिण गोव्यातील विद्यार्थी उत्तर गोव्यात प्रवेश घेऊ शकत नाहीत.

निवासी दाखल्याचे काय?

एका जिल्ह्यातील विद्यार्थ्याला दुसऱ्या जिल्ह्यातील ‘नवोदय’मध्ये प्रवेश घेता येत नाही. त्यासाठी निवासी दाखल आवश्‍यक असतो. हा नियम परीक्षा देण्यापूर्वीच संबंधित विद्यालयाद्वारे सांगितला जातो. शिवाय वय, शाळा, माध्यमांबाबतही काही नियम आहेत. त्यामुळे बाहेरील जिल्ह्यातील किंवा इतर राज्यांतील मुलांना प्रवेश मिळणे अशक्य आहे.

वृत्तवाहिनीमुळे प्रकार उघड

महाराष्ट्रातील एका दूरचित्रवाहिनीवर या प्रकरणातील फोटोसह जी मुले उत्तीर्ण झाली आहेत, त्यांची माहिती दिली आहे. या मुलांना शिकवणाऱ्यांनी या टीव्ही चॅनलवर जाहिरात केली. त्यामुळे हे प्रकरण उघड झाले. याबाबत पालक सागर सावंत, विजय नाईक, विशांत कासार यांनी संशय व्यक्त केला. याबाबत प्राचार्यांनीही समाधानकारक उत्तर दिले नसल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

अद्याप प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. मुले प्रवेशासाठी कागदपत्रे आमच्याकडे देतील, त्यावेळी छाननी होईल. आम्ही कायद्यात राहूनच प्रवेश प्रक्रिया पूर्ण करतो. त्यामुळे कोणत्याही मुलावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, असे प्राचार्य, नवोदय विद्यालयाचे प्राचार्य व्ही. रामश्रीकृष्णया म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED ची गोव्यात मोठी कारवाई! चौगुले उद्योग समूहाच्या सात ठिकाणांवर छापे, कागदपत्रे जप्त

Goa: आई स्वयंपाकात व्यस्त असताना चिमुकलीचा वीज तारेशी संपर्क आला, झारखंडच्या मजुर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला

Panjim News: अग्निशमनच्या नागपुरातील अधिकाऱ्यांना गोव्यात प्रशिक्षण

Harvalem Caves And Waterfall: इतिहास आणि निसर्गाची आवड आहे? मग हरवळेतील धबधबा आणि पांडवकालीन गुहा नक्की पाहा

Goa Top News: म्हादई पात्राची पाहणी, अपघात आणि मॉन्सून अपडेट; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT