Navelim Panchayat Gramsabha Dainik Gomantak
गोवा

Navelim: नावेली पंचायतीत तुफान वादावादी! ग्रामसभाने संपवल्याने वातावरण तंग; CCTV, कर्मचारी भरती विषय पेटले Video

Navelim Panchayat Gramsabha: केरीता मेन्डोन्सा यांनी सांगितले की आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मागणी केली. आम्हाला पंचायत कचेरीत व परिसरात सुरक्षा हवी आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: पंचायत इमारतीत व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, नियमांचे पालन न करता तात्पुरती कारकून भरती, बांधकाम परवाने व कचऱ्याची विल्हेवाट या वरुन नावेली ग्रामसभेत स्थानिक व सरपंच यांच्यामध्ये तुफान वादावादी झाली व अखेर सरपंच पॉल परेरा यांनी ग्रामसभाने संपल्याचे जाहीर केल्याने वातावरण तंग झाले.

केरीता मेन्डोन्सा यांनी सांगितले की आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मागणी केली. आम्हाला पंचायत कचेरीत व परिसरात सुरक्षा हवी आहे. आपण तात्पुरती कारकून भरती, बांधकाम परवाने, सीसीटीव्ही कॅमेरे व कचरा विल्हेवाटीबाबत प्रश्‍न उपस्थित केले. मात्र, सरपंचाकडे योग्य उत्तर नसल्याने त्यांनी लगेच ग्रामसभा तहकूब केल्याचे जाहीर केले व तिथून उठून गेले, असे रोशनी रॉड्रिग्स यांनी सांगितले.

दोन हंगामी कारकूनांची भरती करताना योग्य नियम पाळले नाहीत, हे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच पंचांच्या नातेवाईकांची भरती केल्याचा आरोप रोशनी रॉड्रिग्स यांनी केला. हे घोटाळे लपवण्यासाठी त्यांनी उत्तर न देता ग्रामसभा तहकूब केल्याचा आरोप रॉड्रिग्स यांनी केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सहा सदस्यांची एक समिती नियुक्त करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला.

या संदर्भात पत्रकारांशी बोलताना सरपंच पॉल परेरा यांनी सांगितले की रातवाडो इथे १६ सदनिका व ४ बंगले, असा एक प्रकल्प उभारला जात आहे. आम्ही या जागेची तपासणी केली आहे. आम्हाला काही त्रुटी सापडल्या आहेत. आम्ही नगर नियोजन खाते तसेच उपजिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात लेखी माहिती दिली आहे. मात्र, पंचायतीने या प्रकल्पाला परवाना दिला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ज्या दोन महिला कारकुनांची भरती हंगामी तत्वावर केली आहे, ती नियमाला धरुन आहे. हंगामी भरती करताना काही नियम लागत नाहीत. या कारकुनांना नियुक्ती पत्र दिले नाही. जी एक महिला कारकून होती, त्यांनी राजीनामा दिल्यानेच त्यांची नियुक्ती केली आहे. त्यांना रोजंदारीवर नियुक्त करण्यात आले आहेत. आमच्याकडे काही जणांचे अर्ज आले होते. त्यातून या दोघांची निवड केली आहे. दोघेही नावेली पंचायत क्षेत्रातील आहेत, असे सरपंचानी स्पष्ट केले. ग्रामसभेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासंदर्भात ठरावावर आमचा विचार चालू आहे. किती व कुठे कॅमेरे बसवावे याबद्दलची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही सरपंचांनी स्पष्ट केले.

कचऱ्यासाठी जागेचा शोध सुरू!

काकोडा कचरा प्रकल्पाने पुढील सहा महिन्यांसाठी आमचा कचरा स्वीकारला जाईल, असे सांगितले आहे. त्यानंतर आम्हाला आमची व्यवस्था करावी लागेल. कचरा व्यवस्थापनासाठी जागा शोधण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, असे सरपंच पॉल परेरा यांनी स्पष्ट केले.

पाणी पुरवठा, वीज व सिवरेज पाईपलाईनसाठी रस्ते खणलेले आहेत. आम्ही या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर पत्र लिहिले आहे व कंत्राटदाराला पावसाळ्यापूर्वी हे खड्डे बुजवून रस्ते दुरुस्त करण्यास सांगावे, अशी विनंती केली आहे, असेही सरपंच पॉल परेरा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike 2026: ऑक्टोबर महिन्यात धमाका! नवरात्र-दिवाळीआधी 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट; महागाई भत्त्यात 4 टक्के वाढीचा जॅकपॉट

Houthi Missile Attack Saudi Arabia: मध्य पूर्वेत महायुद्धाचा भडका! हूतींच्या ड्रोन-मिसाईल हल्ल्याने पुन्हा हादरला सौदी अरेबिया; 3 शहरांमध्ये इमर्जन्सी जाहीर

UPI Payment New Rule: यूपीआय वापरणाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर! 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर 1 रुपयाही चार्ज लागणार नाही; गॅझेट नोटिफिकेशन जारी

Horoscope 15 September 2026: ग्रहांचा मोठा फेरबदल! पैशांच्या बाबतीत 'या' राशी ठरणार लकी; आजच्या दिवशी नोकरीत नवीन संधीचा सुवर्णयोग

Terrorist Masood Azhar: पाकड्यांचं नवं नाटक! FATFच्या कचाट्यातून सुटण्यासाठी पाकिस्तानचा बनाव; अजहर मसूदवर 70 लाखांचा इनाम

SCROLL FOR NEXT