Goa Land Grabbing Case Dainik Gomantak
गोवा

SIT च्‍या निरिक्षकाकडून सतावणूक; नावेलीचे व्‍यावसायिक फ्‍लायड कुतिन्‍हो यांची तक्रार, चौकशीची मागणी

कुतिन्‍हो यांनी उपअधिक्षक सागर एकोस्‍कर व अन्‍य पोलिसांविरोधात यापूर्वीही प्राधिकरणाकडे अशीच तक्रार नोंदवली होती.

सुशांत कुंकळयेकर

Goa Land Grabbing Case: 'जमीन हडप प्रकरणांचा तपास करण्‍यासाठी स्‍थापन केलेल्‍या एसआयटी पथकाचे निरिक्षक सुरज सामंत यांच्‍याकडून विनाकारण सतावणूक सुरू आहे आणि वृत्तपत्रांना आपल्‍या संदर्भात खोटी माहिती पुरवतात,' अशा आशयाची तक्रार नावेली येथील व्‍यावसायिक फ्‍लायड कुतिन्‍हो यांनी केली आहे.

मागील आठवड्यात ही तक्रार दाखल करण्‍यात आली असून यात निरिक्षक सामंत यांची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

कुतिन्‍हो यांनी उपअधिक्षक सागर एकोस्‍कर व अन्‍य पोलिसांविरोधात यापूर्वीही प्राधिकरणाकडे अशीच तक्रार नोंदवली होती. सध्‍या या तक्रारीवर प्राधिकरणासमोर चौकशी सुरू आहे.

कुंकळ्‍ळी येथील एका जमीन हडप प्रकरणाची सध्‍या एसआयटी तपास करत असून यापूर्वी या प्रकरणातील एका संशयिताने जामिनासाठी अर्ज केला. त्‍याच्‍या जामिनाला विरोध करताना या प्रकरणातील तपास अधिकारी सामंत यांनी या जमीन हडप प्रकरणाचा कुतिन्‍हो हा मूळ सूत्रधार असे नमूद केले होते.

आता या संदर्भात प्राधिकरणासमोर तक्रार दाखल करताना कुतिन्‍हो यांनी, एका पोलीस उपअधिक्षकाच्‍या सांगण्‍यावरुन निरिक्षक सामंत आपल्‍याला खोट्या गुन्‍ह्यात अडकवू पहात आहेत असा आरोप केला आहे.

दरम्यान, आपल्‍या आरोपाच्‍या समर्थनात त्‍यांनी त्‍या जामिनाला विरोध करताना पोलिसांनी सादर केलेले निवेदन, संबंधितांचे कॉल रिकॉर्डिग्‍स तसेच अन्‍य मजकूर जोडला आहे. पोलीस आपल्‍याकडून पैसे उकळू पहातात असा आरोपही कुतिन्‍हो यांनी केला आहे.

'या जमीन हडप प्रकरणाशी कुतिन्‍हो यांचा संबंध असल्‍याचे पुरावे एसआयटीकडे आहेत. या प्रकरणाची सध्‍या चौकशी चालू आहे. या प्रकरणात आपण गुंतलो जाऊ शकतो, या भीतीनेच कुतिन्‍हो यांनी आपल्‍या विरोधात प्राधिकरणाकडे तक्रार केली असावी,' अशी प्रतिक्रिया निरिक्षक सामंत यांनी त्‍यांच्‍याशी संपर्क साधला असता व्‍यक्‍त केली.

यापूर्वी या प्रकरणात अटक केलेल्‍या संशयितांनी कुतिन्‍हो यांचे या प्रकरणात नाव घेतले आहे असे त्‍यांनी सांगितले. कुतिन्‍हो यांची पोलीस अधिक़ार्‍यांवर आरोप करणे ही नित्‍याची संवय आहे. आपल्‍यावरही त्‍यांनी त्‍यामुळेच तक्रार केली असावी असे सामंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT