South Goa Beach Dainik Gomantak News
गोवा

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

राज्य सरकारने माती किंवा रेतीच्या धूपचा अभ्यास करण्यासाठी शाश्वत किनारी व्यवस्थापनाच्या चेन्नई येथील राष्ट्रीय केंद्राला काम दिले होते.

Manish Jadhav

सासष्टी: राज्यातील समुद्र किनाऱ्यांची होणारी धूपसंदर्भात शाश्वत किनारी व्यवस्थापनाच्या राष्ट्रीय केंद्राने अभ्यास केला आहे. किनाऱ्यांवर रेतीची धूप आणि वृद्धी होतच असते, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. तरी दक्षिण गोव्यातील किनाऱ्यांची धूप जास्त प्रभावित असल्याचे राष्ट्रीय केंद्राच्या अभ्यासात दिसून आले आहे.

दरम्यान, 2010 नंतर किनाऱ्यांवर जे बदल झाले आहेत, त्याचा अभ्यास सुद्धा या राष्ट्रीय केंद्राच्या तज्ज्ञांनी केला आहे. राज्य सरकारने माती किंवा रेतीच्या धूपचा अभ्यास करण्यासाठी शाश्वत किनारी व्यवस्थापनाच्या चेन्नई येथील राष्ट्रीय केंद्राला काम दिले होते. गेल्या महिन्यातच या राष्ट्रीय केंद्राच्या तज्ज्ञांनी पाहणी केली होती.

दोन दिवसांपूर्वी, बेताळभाटी इथे झालेल्या मातीच्या धूपचा अभ्यास करण्यासाठी जी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, त्यात चेन्नई येथील शाश्वत किनारी व्यवस्थापनाच्या राष्ट्रीय केंद्राने पाहणी करुन केलेल्या अभ्यासाचा अहवाल सादर केला होता.

दुसरीकडे, 1990 ते 2024 या 34 ते 35 वर्षांच्या कालावधीत गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर रेतीची धूप 27 कि.मी. वरून 39 कि.मी. एवढी वाढ झाली आहे. त्यात दक्षिण गोव्यातील (South Goa) रेतीच्या धूपमध्ये 4.8 कि.मी. वरून 17.55 कि. मी. एवढी वाढ झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

रेती धूप उत्तर गोव्यातील (North Goa) किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात झालेली नाही. याचे कारण येथील 47.53 कि.मी. किनारपट्टीतील 42 टक्के किनारपट्टी खडकाळ आहे व 58 टक्के रेतीयुक्त आहे. दक्षिण गोव्याची किनारपट्टी 117.29 कि. मी. लांबीची आहे. त्यातील 60 टक्के किनारपट्टी खडकाळ व 40 टक्के रेतीयुक्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT