Boxer Pushpendra Rathi Dainik Gomantak
गोवा

Boxer Pushpendra Rathi : गोव्यासाठी पदक जिंकलेला बॉक्सर बलात्कारप्रकरणात ‘नॉकआउट'; लग्नाचे आमिष देऊन केले अत्याचार

संशयिताला पर्वरी येथील फ्लॅटमधून अटक केली

दैनिक गोमन्तक

Goa Boxing : लग्नाचे आमिष दाखवून पर्वरी येथील हॉटेलात एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी राष्ट्रीय पदक विजेता बॉक्सर संशयित पुष्पेंदर राठी (22) याला अटक केली आहे. त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पुष्पेंदरविरुद्ध पोलिसांनी बलात्काराचा व फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ हरियाणा येथील संशयित पुष्पेंदर राठी व तक्रारदार तरुणी हे दोघेही बॉक्सरपटू असल्याने त्यांची ओळख झाली. त्यानंतर संशयिताने तिच्याशी जवळीक करून मैत्री वाढविली. तो गोव्याकडून बॉक्सर म्हणून प्रतिनिधित्व करीत होता.

त्यामुळे त्याच्याकडून शिकता येईल म्हणून तिने त्याच्याशी मैत्री केली. तो तिला या खेळामधील माहिती देऊ लागल्याने पीडित तरुणी त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकत गेली. त्याने तिला विवाह करण्याचे आमिष दाखवून ऑक्टोबर २०२१ ते मार्च २०२३ या दरम्यान हॉटेलात नेऊन लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर त्याने पीडित तरुणीपासून दूर राहणे पसंत केले.

1 लाखाचे जाहीर झाले होते बक्षीस

गेल्या वर्षी गुजरातमध्ये झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याला पाच ब्राँझपदके मिळाली होती. त्यापैकी एक पदक पुष्पेंदरने जिंकले होते. त्याबद्दल त्याला राज्य सरकारने १ लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते.

पुरुषांच्या मिडलवेट गटात तो पदकाचा मानकरी ठरला होता. याशिवाय, राज्यातील विविध स्पर्धांत भाग घेत त्याने पदके मिळवली होती.

विवाहाचा विषय काढताच झिडकारले

संशयिताने गैरफायदा घेऊन फसवणूक केल्याने तरुणीने महिला पोलिसांत तक्रार दाखल केली. प्राथमिक चौकशीनंतर संशयिताला पोलिसांनी तो राहत असलेल्या पर्वरी येथील फ्लॅटमधून अटक केली. त्याने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिने त्याला विवाह करण्याबाबत विचारले असता त्याने झिडकारले व संबंध तोडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT