National Highway Vasco
National Highway Vasco Dainik Gomantak
गोवा

मुंडवेल वास्को येथील राष्ट्रीय महामार्गाला पुन्हा भगदाड

दैनिक गोमन्तक

वास्को: मुंडवेल वास्को येथील राष्ट्रीय महामार्गाला आज पुन्हा एकदा भगदाड पडल्याने संबंधी अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली. भगदाड पडलेत्या ठीकाणी बॅरिकेड टाकून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करण्यात आले. वाडे येथील पै नर्सिंग होम इस्पितळा शेजारीही राष्ट्रीय महामार्गाची तीच अवस्था झाली आहे. (National highway at Mundvel - Vasco broken again today )

आठवड्यापूर्वी मूंडवेल येथे नंतर दोन दिवसांनी गोवा शिपयार्ड समोर राष्ट्रीय महामार्ग खचून दोन्ही ठीकाणी मोठे खड्डे पडून भगदाड तयार झाले होते. पैकी मुंडवेल येथे एक दुचाकीस्वार पडून जखमी झाला होता. त्यामुळे वाहनधारकांचा जीव धोक्यात आला आहे. दरम्यान त्याच दिवशी संबंधीत अधिकाऱ्यांनी धाव घेऊन रस्त्यावर पडलेला मोठा खड्डा बुजवून त्यावर डांबर घातला होता. दरम्यान आज पुन्हा त्याच खड्यावर पुन्हा एकदा रस्ता खचून गेल्याने राष्ट्रीय महामार्गावर मोठे भगदाड तयार झाले आहे.

त्यामुळे वाहनधारकांचा जीव पुन्हा धोक्यात आला आहे. चर्च ते वाडेपर्यंत रस्त्याची आता दुरावस्था झाली आहे. आज पुन्हा वास्कोतील मुंडवेल येथील केटीसी बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरील मुख्य रस्ता खचल्याने संबंधीत अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. त्याने तात्काळ भगदाड ठीकाणी बॅरिकेड टाकून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. चर्च ते वाडे दरम्यानचा रस्ता वाहन चालकांसाठी धोक्याचा बनला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

District and Sessions Court: कोलवा येथील वेश्याव्यवसाय प्रकरणात दोषी ठरलेला विजय सिंगला 3 वर्षांची कैद

Panaji News : सांताक्रुझ मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणार : आमदार रुडाॅल्फ फर्नांडिस

इंजिनिअरिंग ड्रॉपआऊट विद्यार्थ्याने Chat GPT च्या मदतीने सुरु केली बनावट कॅसिनो वेबसाईट, गोवा पोलिसांनी केली अटक

Goa And Kokan Today's Live News: 2024 - 25 वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार

PM Modi ON UCC: ‘’गोव्यातील लोक एक सारखे कपडे घालतात का?’’ समान नागरी कायद्याच्या प्रश्नावर मोदी स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT