goa student Dainik Gomantak
गोवा

Goa Student अखेर ‘त्या’ दोन मुलांना नर्सरीत प्रवेश!

गोवा खंडपीठाचा निर्देश: सहा वर्षे पूर्ण झालेल्यांनाच पहिलीत प्रवेश मिळेल, स्पष्टीकरण द्या

दैनिक गोमंतक

यावर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले आहे. त्यानुसार नर्सरीच्या प्रवेशासाठी 1 जूनपर्यंत 3 वर्ष पूर्ण झालेल्या मुलांनाच प्रवेश देण्याचे परिपत्रक काढले असताना शिक्षण उपसंचालकांनी एक दिवस कमी असलेल्या दोन मुलांना सवलत देत प्रवेश दिला. पण ज्या मुलांना 3 वर्ष पूर्ण होण्यास काही दिवस कमी होते, त्यांना प्रवेश नाकारल्याने त्यांच्या पालकांनी न्यायालयात याचिका सादर करून त्यांनाही सवलत देण्याचे विनंती केली होती.

उपसंचालकांनी केलेल्या चुकीमुळे अखेर गोवा खंडपीठाने या मुलांनाही प्रवेश देण्याचे निर्देश दिले, मात्र पहिल्याच्या प्रवेशासाठी 1 जूनला 6 वर्षे पूर्ण झालेल्या मुलांनाच प्रवेश मिळेल यासंदर्भातचे स्पष्टीकरण येत्या 15 दिवसांत करण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालकांना खंडपीठाने दिले. यावर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून नर्सरी ते प्राथमिक वर्गापर्यंत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुरू केले आहे.

नर्सरी प्रवेशासाठी 1 जूनपर्यंत 3. त्यामुळे जून महिन्यात जन्मलेल्या मुलांना नर्सरीत प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे या मुलांचे एक वर्ष वाया जाणार आहे. 6 व 27 जूनला तीन वर्षे पूर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेशात सूट देण्यासंदर्भात सरकारला निर्देश देऊन न्याय द्यावा, अशी याचिका सादर केली आहे. आज या याचिकेवर सुनावणीवेळी सरकारला उद्या 8 ऑगस्टपर्यंत उत्तर देण्यास खंडपीठाने सांगितले आहे.

याचिकादार असलेल्या मुलांच्या पालकांनी गोवा खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार पहिल्याच्या वर्गासाठी 6 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय प्रवेशासाठी दावा केला जाणार नाही, अशी हमी दिली आहे. त्यामुळे खंडपीठाने याचिकादारांना नर्सरीमध्ये प्रवेश देण्यात यावा, मात्र ही मोकळीक पहिलीच्या वर्गात प्रवेशासाठी असणार नाही व त्यासाठी याचिकादारांचे पालक दावा करू शकणार नाहीत.

सरकारच्या परिपत्रकात हस्तक्षेप करण्याइतपत मुद्दे नाहीत, मात्र उपसंचालकांनी दोन मुलांना दिलेल्या सवलतीमुळे हा निर्णय देण्यात येत आहे, असे स्पष्ट करून याचिका निकालात काढली आहे.

मधुराज भूपेश प्रभुदेसाई आणि गुंज गिरीश कवठणकर या मुलांच्या पालकांनी ही याचिका सादर केली होती. राज्य सरकारने यंदापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू केली आहे.

मुलांना वयाच्या तिसऱ्या वर्षानंतर जे शिक्षण दिले जाणार आहे, ते पुस्तकरहित व ‘फाऊंडेशन-१’ या नावाने आहे. या अभ्यासक्रमाची सुरुवात ३ जुलैपासून करण्यात आली. पण, त्यासाठी जूनमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bandoda Theatre Tradition: गोव्यातल्या जत्रा, नाटके आणि आठवणींची नांदी, बांदोड्याच्या सालातली तालीम

Lady Fish Marathi Cuisine: मूडदुशी... जिभेला आल्हाद आणि मनाला 'मूडखुशी' देणारा मासा!

Self Discovery Through Writing: लेखन, कीर्तन आणि भजन; समाजप्रबोधनाची आणि आत्मशोधाची उज्वल परंपरा

Viral Video: 'तिकीट कन्फर्म होतं बहुतेक!' रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांऐवजी म्हशींचा वावर, डब्यात बकऱ्यांचा मुक्काम; व्हिडिओ झाला व्हायरल

Marathi Konkani Language Debate: मराठी आणि कोंकणीच्या संघर्षातून भाजपचा राजकीय उदय

SCROLL FOR NEXT