National Cyclone Project Dainik Gomantak
गोवा

Goa Government: मांद्रेतील नॅशनल सायक्‍लॉन प्रकल्प अजूनही विनावापर!

नॅशनल सायक्‍लॉन प्रकल्प एक वर्षाचा काळ उलटला तरी आजपर्यंत विनावापर पडून आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Government: किनारी भागातील लोकांना चक्रीवादळापासून सुरक्षा मिळावी म्‍हणून मांद्रे येथे 2021 साली पायाभरणी करण्‍यात आलेला व 2022 साली लाकार्पण करण्‍यात आलेला नॅशनल सायक्‍लॉन प्रकल्प एक वर्षाचा काळ उलटला तरी आजपर्यंत विनावापर पडून आहे.

तत्कालीन आमदार दयानंद सोपटे यांच्या प्रयत्नाने सदर प्रकल्प उभारण्‍यात आला होता. किनारी भागात एखाद्या वेळी वादळ, वारे, पाऊस किंवा एखादी त्‍सुनामी आली आणि तेथील ग्रामस्‍थांसह त्‍यांच्‍या घरांना धोका निर्माण झाला तर त्यांची सुरक्षेसाठी हा प्रकल्‍प उभारण्‍यात आला आहे.

गेल्‍या वर्षी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते त्‍याचे अनावरण करण्‍यात आले होते. परंतु अजूनही हा प्रकल्‍प तसाच पडून आहे.

उद्‌घाटनावेळी मुख्‍यमंत्री म्‍हणाले होते की, पंचायत क्षेत्रातील एखादी छोटेखानी बर्थडे पार्टी, सांस्कृतिक कार्यक्रम, पुस्तक प्रकाशन असे विविध कार्यक्रम करण्यासाठी या जागेचा वापर करावा आणि त्यासाठी स्थानिक पंचायतीकडून परवानगी घ्यावी. तसेच या प्रकल्पाचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा. मात्र आजपर्यंत या प्रकल्पात एकही कार्यक्रम झालेला नाही.

शिवाय येथे टाळे लावल्‍यामुळे इमारत विनावापर पडून आहे. त्या परिसरात लावलेल्या झाडांना योग्य प्रमाणात पाणी घातले जात नाही किंवा त्‍यांची देखरेख करण्यासाठी एकही माणूस नाही. त्यामुळे सरकारने अशा प्रकल्पावर खर्च केलेले कोट्यवधी रुपये पाण्यात जातात की काय, अशी भीती व्यक्त करण्‍यात येत आहे. या प्रकल्पाचा वापर करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT