Narendra Modi: गोव्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. याबाबतीत सध्याचा सत्ताधारी पक्ष भाजप पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी कसोटीचे प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीच्या प्रचारार्थ आज गोव्यात दाखल होणार आहेत.
दाबोळीचे भाजप (BJP) उमेदवार तथा पंचायत मंत्री माविन गुदिन्हो (Mauvin Godinho) यांनी मोदींचे गुणगान गात अप्रत्यक्षपणे विरोधकांवर टोला लगावला आहे. ते म्हणाले की, मोदी आधी गोव्याचे निवडणूक प्रभारी होते त्यानंतर ते देशाचे पंतप्रधान बनले. आता त्यांच्या उत्कृष्ट कर्तृत्वामुळे त्यांना आता 'विश्वगुरु' म्हणून संबोधले जाते. (Narendra Modi is Vishwaguru Mauvin Godinho)
ते जगातील सर्वात उत्कृष्ट नेते बनले आहेत. पंतप्रधानांच्या राजनीतीमुळे अमेरिकेचे राष्ट्रपती त्यांच्याकडून सल्ले घेतात. त्याचबरोबर इतर पाश्चात्य देश, त्यांचे राष्ट्रपती, पंतप्रधान सुद्धा नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून सल्ले घेत असतात; कारण आपल्या पंतप्रधानांकडे ते नेतृत्व कौशल्य आहेत, असे मत माविन गुदिन्हो यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान गोव्याच्या निवडणुकीत भाजपच्या पदरी काय पडणार हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.