narayan rane meets union minister nitin gadkari  Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Highway: गणेश चतुर्दशीपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण करा; नारायण राणेंनी घेतली नितीन गडकरींची भेट

Narayan Rane Meets Union Minister Nitin Gadkari: मुंबई गोवा महामार्गाचे (Mumbai Goa Highway) प्रलंबित राहिलेले काम गणपतीपर्यंत पूर्ण व्हावे, अशी मागणी राणे यांनी गडकरी यांच्याकडे केली.

Manish Jadhav

माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थान भेट घेतली. या भेटीत त्यांनी अनेक मुद्यांवर चर्चा केली.

त्यामध्येही प्रकर्षाने मुंबई गोवा महामार्गाचे (Mumbai Goa Highway) प्रलंबित राहिलेले काम गणपतीपर्यंत पूर्ण व्हावे, अशी मागणी राणे यांनी गडकरी यांच्याकडे केली. याशिवाय, पत्रादेवी ते राजापूर भागाचे लवकरात लवकर सुशोभीकरण करण्यात यावे अशी विनंती देखील राणे यांनी केली.

दरम्यान, राणे यांनी खासदार बनताच मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात लक्ष घातले आहे. यंदा 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी (Ganpati Utsav 2024) आहे. याच दिवशी लाडक्या गणपती बप्पाचे आगमन होते.

बप्पाचे स्वागत करण्यासाठी चाकरमानी मुंबईसह (Mumabi) महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमधून कोकणात जातात. त्यापूर्वी या महामार्गाचे काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी यावेळी राणे यांच्याकडून गडकरी यांना करण्यात आली.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणे निवडून आले. त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांना शिकस्त दिली. निवडणुकीच्या प्रचारात राणे यांनी कोकणाच्या विकासाचा शब्द मतदारांना दिला होता. हा शब्द लक्षात ठेवून राणे यांनी कामाला सुरुवात केल्याचे दिसते. त्यांनी पहिल्यांदा मागील काही वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या मुंबई गोवा (Goa) महामार्गाच्या मुद्याला हात घातल्याचे दिसतेय.

मुंबई गोवा महामार्ग मागील काही वर्षांपासून रखडलेला आहे. या काळात अनेक पक्षांची सरकारे आली पण हा महामार्ग पूर्ण होऊ शकला नाही. गेल्या 14 वर्षांपासून पावसाळी, अर्थसंकल्पीय आणि हिवाळी अधिवेशनात मुंबई गोवा महामार्गासंबंधी प्रश्न उपस्थित केले जातात. पण दरवेळी सत्ताधाऱ्यांकडून आश्वासनांची खैरात वाटली जाते. लवकरच आम्ही हा महामार्ग तयार करु अशी पोकळ आश्वासने दिली जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Bike Week 2024: स्टंट, म्युझीक आणि बरंच काही... गोव्यात होणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या बाईक इव्हेंटचे वेळापत्रक प्रसिद्ध

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांची कारवाई! सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT