Narakasur  Dainik Gomantak
गोवा

Narakasur: नरकासूर जळाला, तरी गोवावासीयांना देतोय त्रास; अपघातांचा धोकाही वाढला

Narakasur iron spikes: सर्वत्र दिवाळीचा उत्साह असला तरी डिचोलीत विविध भागात नरकासुराचे लोखंडी सांगाडे अजूनही रस्त्याच्या बाजूने पडून असल्‍याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: अनिष्ट प्रवृत्तीचे प्रतीक असलेल्या नरकासुरांचे दहन करून, सर्वत्र दिवाळीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. सध्‍या सर्वत्र दिवाळीचा उत्साह असला तरी डिचोलीत विविध भागात नरकासुराचे लोखंडी सांगाडे अजूनही रस्त्याच्या बाजूने पडून असल्‍याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

अलीकडच्या काही वर्षांपासून नरकासुरांचे प्रस्थ वाढले आहे. शहरातील गल्लोगल्ली आणि गावोगावी नरकासुर करण्यात येत असतात. बहुतांश मंडळांकडून लोखंडी सांगाड्यांचा वापर करून अवाढव्य नरकासूर उभे करण्यात येतात.

नरकासुर दहन केल्यानंतर लाकडी सांगाडे जळतात. मात्र लोखंडी सांगाडे तसेच राहतात. हे सांगाडे वेळीच बाजूला करण्याकडे दुर्लक्ष होत असते. यंदाही डिचोलीत काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूने लोखंडी सांगाडे पडून असल्याचे चित्र दिसत आहे.

हे सांगाडे धोकादायक बनत असून, सांगाड्यांमुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखादा अनर्थ घडण्यास कारणीभूत ठरण्यापूर्वी रस्त्यावरील हे सांगाडे काढावेत, तशी मागणीही वाहनचालक आणि सामान्य जनतेकडून होत आहे.

जबाबदारी कोण स्‍वीकारणार?

नरकासुर दहन केल्यास आज तीन दिवस उलटले तरी काही ठिकाणी हे सांगाडे रस्त्याच्या बाजूने अस्ताव्यस्त अवस्थेत पडून असल्याचे दिसून येत आहेत. ते काढण्याची आता जबाबदारी कोण स्वीकारणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोमवारी दिवाळीच्या पहाटे डिचोलीत सर्वत्र रस्त्याच्या बाजूने नरकासुराच्या प्रतिमा जाळण्यात आल्या. काही ठिकाणी सांगाड्यांसह अर्धवट अवस्थेत जळालेले अवशेषही पडून आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT