Naneli Waterfall Goa  Dainik Gomantak
गोवा

नानेली धबधबा येथे रविवारी पावसाळी पदभ्रमण मोहिम

गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे येत्या 17 जुलै रोजी नानेली धबधबा येथे पावसाळी पदभ्रमण मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे येत्या 17 जुलै रोजी नानेली धबधबा येथे पावसाळी पदभ्रमण मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. नानेलीच्या जंगलात असलेला हा मोसमी धबधबा असून तेथे पोचण्यासाठी मोठ्या प्रमाणात श्रम घ्यावे लागत नाहीत. या धबधब्याचे उंचावरून दर्शन घेणे अत्यंत आल्हाददायक आहे.

या धबधब्यावर पोचण्यासाठी आपल्याला नानेली गावातून 3 किलोमीटर चालावे लागते. हे पदभ्रमण सोपे आहे. यासाठी दोन्ही बाजूंकडून मिळून एकूण 6 किमी चालावे लागते. तर बसने पणजी ते वाळपई हे अंतर 52 किमी आहे. साहसाची आवड असलेल्या सर्व निसर्गप्रेमींसाठी हे पदभ्रमण खुले आहे. यासाठी मडगाव व म्हापसा येथून बसची व्यवस्था सकाळी ७ वा. करण्यात आली आहे.

पणजी येथील पर्यटन भवनजवळून सकाळी 9 वा. बसची व्यवस्था आहे. तसेच ओल्ड गोवा, बाणस्तारी व साखळी आरोग्य केंद्र येथे थांबा घेण्यात येईल. नोंदणी शुल्क भोजनासह रू. 1000/- असे आहे. इच्छुकांनी सोबत कपड्यांची अतिरिक्त जोडी, रेनकोट, ट्रेकिंग शूज, पाण्याची बाटली, स्नॅक्स आणि दुर्बिण असे साहित्य घ्यावे असे कळविण्यात आले आहे. धूम्रपान व मद्यपानाला मनाई असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT