Liquor Dainik Gomantak
गोवा

Goa News: ओव्हरडोस नडला; नागपूरच्या तळीरामाचा गोव्यात मृत्यू

Vasco Goa Crime News: ३१ मे रोजी त्याने मित्रांसोबत अधिक प्रमाणात मद्य पिले. फ्लॅटवरती तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला.

Pramod Yadav

वास्को: दारुचे अधिक प्रमाणात सेवन केल्याने ३७ वर्षीय नागपूरच्या व्यक्तीचा गोव्यात मृत्यू झाला आहे. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ३१ मे रोजी झुआरीनगर, वास्को येथे हा प्रकार उघडकीस आला.

वेर्णा पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३७ वर्षीय नागपूरचा व्यक्ती वास्को येथील झुआरीनगर येथे वास्तव्यास आहे. ३१ मे रोजी त्याने मित्रांसोबत अधिक प्रमाणात मद्य पिले. फ्लॅटवरती तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला.

मित्रांनी त्याला चिखली येथील रुग्णालयात दाखल केले पण, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. मृत व्यक्तीची उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, व्हिसेरा राखून ठेवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

Goa Drug Racket: आशा, रोविनानंतर आता पोक्सो कैदी योगेश मांद्रेकरही अटकेत; कोलवाळ जेल ड्रग्स प्रकरणात तिसरी कारवाई

Goa Municipal Elections: विधानसभेपूर्वीच पालिका निवडणुका! 11 नगरपालिकांसाठी कोर्टाचा मोठा आदेश, 4 जानेवारीपर्यंत निकाल

Operation Sindoor: ''शेवटचा वार भारताचाच असणार होता''!, 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माजी CDS अनिल चौहान यांचा धक्कादायक खुलासा; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची दैना VIDEO

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

SCROLL FOR NEXT