Michael Lobo 

 

Dainik Gomantak 

गोवा

माझी नाराजी विशेष बैठकीनंतर पुर्णपणे दुर झाली: मायकल लोबो

भाजप पक्षासोबतच आपण आगामी विधानसभेची निवडणूक लढविणार, असे मायकल लोबो म्हणाले.

दैनिक गोमन्तक

कळंगुट: भारतीय जनता पक्षातील वरिष्ठांशी असलेले मतभेद तसेच वैयक्तिक नाराजी विशेष बैठकीनंतर पुर्णपणे दुर झाली आहे. त्यामुळे पक्षासोबतच आपण आगामी विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचा निर्धार कळंगुटचे आमदार तसेच मंत्री मायकल लोबो (Michael Lobo) यांनी व्यक्त केला आहे. कांदोळी येथील एका कार्यक्रमानंतर त्यांनी 'गोमन्तक'सोबत संवाद साधताना ही माहिती दिली.

आपण कुणाच्याही दबावाखाली आलेलो नसून गेली पंधरा वर्षे पक्षांशी असलेली निष्ठा आणि स्व.मनोहर पर्रीकरांचा (Manohar Parrikar) वारसा पुढे नेण्याच्या ध्येयापोटीच भाजपची (BJP) कास धरण्याचा निर्धार केल्याचे मंत्री लोबो यांनी शेवटी सांगितले. दरम्यान, लोबोंच्या या वक्तव्यानंतर गेले कित्येक दिवस लोबो पक्षाला सोडचिठ्ठी देतील म्हणून उठलेल्या अफवांना आता चाफ बसल्यातच जमा झाला आहे.

प्रत्येक पक्षात रुसवे-फुगवे असतातच तसे ते भाजपातही आहेत. पक्षातील नाराजी संबंधात इतरांपेक्षा मीच अधिक पोटतिडकीने बोललो. त्यामुळे मला टार्गेट करण्यात आले.परंतु सोमवारी पक्षाच्या वरिष्ठांशी झालेल्या विशेष बोलणीनंतर या सर्व गोष्टींना तिलांजली मिळाली. दरम्यान, बार्देशातील शिवोली मतदारसंघात दिलायला लोबोंंना भाजपने तिकीट नाकारल्यास त्या निश्चितच अपक्ष म्हणून स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. हा निर्णय त्यांचा स्वत:चा असल्याचे मंत्री लोबो यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT