Crime News Dainik Gomantak
गोवा

चार वर्षांनंतर घरी परतला आणि बलात्काराच्या गुन्ह्यात अडकला

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण : नराधम बापाला मडगावात अटक

गोमन्तक डिजिटल टीम

चार वर्षांपूर्वी स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या 41 वर्षीय नराधम बापाने कर्नाटकातून येऊन मडगावात आज आपल्या घरी प्रवेश करताच त्याच्या मुसक्या मडगाव पोलिसांनी आवळल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित हमालीचे काम करत होता. तो मडगावातील घर सोडून आपल्या मूळ गावी कर्नाटकात गेला होता. आता तो चार वर्षांनी परत आपल्या घरी येऊ पाहात होता.

पण बाप घरी आल्यास आपल्याला पुन्हा त्याच्या वासनेची शिकार व्हावे लागणार, याची भीती असल्याने मुलीने त्याला घरात घेण्यास कडाडून विरोध केला आणि चार वर्षांपूर्वीचा हा प्रकार उघडकीस आला.

...आणि बापाचे कुभांड उघडे

काही दिवसांपूर्वी त्याने पत्नीशी संपर्क साधून आपण घरी परत येतो, असे सांगितले होते. ही गोष्ट तिने आपल्या मुलीच्या कानावर घातल्यावर तिने बापाला घरात घेण्यास कडाडून विरोध केला.

याचे कारण आईने खोदून विचारल्यावर तिने चार वर्षांपूर्वी आपल्याबाबत घडलेला प्रसंग कथन केला. याची तक्रार नोंदवल्यावर पोलिसांनी त्या नराधमाला अटक केली.

संशयिताने कर्नाटकातही एका अल्पवयीन मुलीवर बळजबरी केल्याचा प्रकार उघडकीस आला असून पोलिस त्याही घटनेचा तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

SCROLL FOR NEXT