Murder of youth in Ponda area of Goa Dainik Gomantak
गोवा

सांतइस्‍तेव्‍ह येथे युवकाचा खून, खांडोळा पुलाखाली आढळला मृतदेह

फोंडा पोलिस स्थानकाच्या हदीत पंधरा दिवसांत 3 खून

दैनिक गोमन्तक

फोंडा: फोंडा पोलिस स्थानकाच्या कक्षेत येत असलेल्या खांडोळा - सांतइस्तेव्ह येथे जबर मारहाणीमुळे एका बिगर गोमंतकीय मजुराचा मृत्यू होण्याची घटना घडली. फोंडा पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार काल रविवारी सकाळी घडला. मृत व्यक्तीचे नाव हरींदर हिरालाल प्रसाद (वय 44) असे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

एक अज्ञात इसम रक्तबंबाळ अवस्थेत खांडोळा - सांतइस्तेव्ह पुलाच्या खाली नदीच्या काठावर पडल्याची माहिती स्थानिकांनी 108 रुग्णवाहिकेला दिल्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी बेतकी आरोग्य केंद्रात आणण्यात आले. मात्र, इस्पितळात नेण्याआधीच हरींदर प्रसाद मरण पावला. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करून फोंडा पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी इस्पितळात धाव घेतली असता हरींदरच्या डोक्यावर तसेच शरीराच्या अन्य भागावर गंभीर स्वरुपाच्या जखमा आढळल्या. अतिरक्तस्त्राव व डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचे निधन झाले असावे, असा कयास व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांनी मृतदेह शवचिकित्सेसाठी बांबोळी इस्पितळात पाठवला आहे. मयत हरिदर हा मूळ बिहारचा असून तो व त्याचा अन्य एक भाऊ अमयवाडा - खांडोळा येथे भाड्याच्या खोलीत राहत होते, तर त्याचे अन्य दोन भाऊ मूळ गावी बिहारला राहतात. हरींदर हा कंत्राटदारामार्फत गवंडी काम करीत होता. मात्र, त्याचा खून करण्यासाठी त्याच्यावर जबरी हल्ला चढवला असल्याचे निदर्शनास आले असून हल्लेखोर एकटा की अन्य साथीदार होते याबाबत पोलिस तपास करीत आहेत.

तर्कवितर्कांना ऊत

हा खून पैशांच्या वादातून की दारुपाना मुळे की वेश्या व्यवसायामुळे झाला आहे काय याबाबतही तर्कवितर्क काढण्यात येत आहेत. पोलिसांनी काही संशयिताना ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरु आहे. या खुनप्रकरणी पोलिस अधिक्षक पंकजकुमार सिंग यांच्या मागदर्शना खाली उपअधिक्षक नेल्सन अल्बुकर्क, उदय परब तसेच निरीक्षक मोहन गावडे करीत आहेत. पोलिसांनी श्वान पथक व इतर साहित्याचा वापर केला, पण ठोस काही मिळाले नसल्याचे समजते.

पंधरा दिवसांत तिसरा खून

फोंडा पोलिस स्थानकाच्या हदीत पंधरा दिवसांच्या कालावधीत हा तिसरा खून झाला आहे. गेल्या 16 ऑक्टोबर ला फोंड्यात दोन वृद्ध महिलांचा खून करण्यात आला होता. आता तिसऱ्या खुनाची नोंद झाली आहे. सुदैवाने त्या खुनाचा छडा लागला होता, मात्र आता नवे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 6 स्टार खेळाडूंना डच्चू, कोहली- बुमराहचं कमबॅक

Monsoon Update: पावसाची चाहूल; 22 आणि 23 जूनला अनेक भागांत पावसाचा अंदाज, यलो अलर्ट जारी

Land Fraud Case: अंबेशी येथील जमीन व्यवहारात कोट्यवधी रुपयांची फसवणूक, जमीनमालकाची वाळपई पोलिसांत तक्रार दाखल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात 3% वाढीची शक्यता; पगारवाढ कधीपासून लागू होणार?

Karapur Mega Project: कारापूर प्रकल्प विरोधातील आंदोलन तापण्याची शक्यता, पायवाटांवरून पुढे केलेल्या अटी ग्रामस्थांना अमान्य

SCROLL FOR NEXT