'त्या' विवाहित महिलेचा खूनच! पतीवर संशय

 
Dainik Gomantak
गोवा

'त्या' विवाहित महिलेचा खूनच! पतीवर संशय

त्यावेळी तोल जाऊन जिन्यावरून खाली कोसळून तिचा मृत्यू झाला असे पतीने सांगितले होते.

दैनिक गोमन्तक

मडगाव: मडगावमध्ये (Margao) एका विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. बाळंतपणात अशक्त झाल्यामुळे बाळाचे कपडे धुण्यासाठी विवाहिता बाथरुममध्ये गेली. त्यावेळी तोल जाऊन जिन्यावरून खाली कोसळून तिचा मृत्यू झाला असे पतीने सांगितले होते. मात्र, तो फक्त बनाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. महिलेच्या अंगावर चाव्यांचे व्रण सापडल्याने तिला मारहाण केल्यामुळेच मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणात तपास करणारे उपजिल्हाधिकारी प्रसाद वळवईकर यांनी या प्रकरणी मडगाव पोलिसात बुधवारी रात्री उशिरा तक्रार दिली. मडगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणी महिलेचा पती सागर तिंबाडिया याच्यावर संशय व्यक्त केला जात आहे.

ही घटना 10 डिसेंबर रोजी रात्री 11 च्या सुमारास घडली होती. अंकिता तिंबाडिया (29) असे मृतेचे नाव आहे. पत्नीला बाळंतपणानंतर चिकनगुनियाची बाधा झाल्याने ती अशक्त होती. त्या रात्री तिला उलट्या सुरू झाल्या. त्याच अवस्थेत ती बाळाचे कपडे धुण्यासाठी बाथरुमात गेली. त्यावेळी आपण बाळाला भरवत होतो. काही वेळाने आपण बाथरुमात गेलो तेव्हा ती आपल्याला बेशुद्ध अवस्थेत सापडली असे तिचा पती सागर याने पोलिसांना सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT