Crime Canva
गोवा

Goa Murder Case: धारदार शस्त्राने वार करून खून; ओर्डा-कांदोळी येथील घटना

Goa Crime News: परिसरातील सीसीटीव्ही फूटेजच्या सहाय्याने संशयिताचा शोध सुरु

गोमन्तक डिजिटल टीम

ओर्डा-कांदोळी येथे अरनॉल्ड सुवारिस (६९) यांचा धारदार शस्त्राने पाठीवर सपासप वार करून खून झाला होता. मात्र, अद्याप पोलिसांना खुनाचे धागेदोरे सापडले नव्हते. कळंगुट पोलिस कांदोळी व परिसरातील सीसीटीव्ही फूटेजच्या सहाय्याने संशयिताचा शोध घेत आहेत.

एका फुटेजमध्ये संशयित दिसतो, मात्र चेहरा नीट दिसत नाही. त्यामुळे तपासाची भिस्त ही सीसीटीव्ही फूटेज तसेच इतर तांत्रिक बाबींवर आहे. अरनॉल्ड सुवारिस हे अविवाहित होते. त्यांचे भाऊ-बहीण हे कॅनडामध्ये असतात. त्यामुळे उतरीय तपासणीसाठी नातेवाईक भारतात परतण्याची प्रतीक्षा पोलिस करत आहेत.

खुनाचे नेमके कारण अस्पष्ट

सुवारिस यांच्या घरातून मौल्यवान वस्तू तशाच आहेत. त्यामुळे या खुनामागे इतर दुसरे कारण असू शकते का? या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. एका फुटेजमध्ये एकजण गाडीतून जाताना दिसतो. ही तिच कार आहे, जी संशयिताने सुवारिस यांच्या घरासमोरून नेली होती. मात्र त्यादिवशी पाऊस पडत असल्याने गाडीतील चेहरा धूसर दिसतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

ED Raid: 155 कोटींचा बँक घोटाळा अन् 'ईडी'चा थेट गोव्यात छापा! 'या' बड्या कंपनीवरील कारवाईने देशभरात खळबळ

SCROLL FOR NEXT