Ponda Corporation Dainik Gomantak
गोवा

Ponda Corporation : फोंड्यातील भंगार वाहने हटवण्यास पालिकेकडून प्रारंभ

Ponda Corporation : फोंडा नगराध्यक्ष रितेश नाईक यांची कार्यवाही : फोंडावासीयांकडून झाले स्वागत

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda Corporation :

फोंडा पालिकेने अखेर भंगारातील वाहने हटवण्यास प्रारंभ केल्याने फोंडावासीयांनी या कृतीचे स्वागत केले आहे. गेला बराच काळ ही भंगार वाहने मोक्याच्या जागा अडवून बसली होती, त्यामुळे सुरळीत वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता.

सुमारे बावीसपेक्षा जास्त भंगार वाहने फोंड्यात असून गुरुवारी (ता.१३) सकाळी ही कारवाई सुरू करण्यात आली.

फोंडा पालिका क्षेत्रातील भंगार वाहनांचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. शहर परिसरातील विविध ठिकाणी गेला बराच काळ पार्क करून ठेवलेल्या या वाहनांमुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे ही वाहने हटवून एका जागी ठेवण्याची गरज होती. त्यानुसार फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीत ही भंगारातील वाहने हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.

सर्व नगरसेवकांनी त्याला अनुमोदन दिले आणि पालिका प्रशासनाने ही वाहने हटवण्यास सुरवात केली. पालिका मुख्याधिकारी, अभियंता तसेच इतर अधिकाऱ्यांनी त्यासाठी वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने कारवाई सुरू केली आहे.

फोंडा पालिका स्वच्छ आणि सुंदर करण्याकडे पालिकेने कटाक्ष ठेवला आहे. ही वाहने गेली बराच काळ एकाच जागी पडून असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण व्हायचा आणि शहराच्या सौंदर्यालाही बाधा यायची. त्यामुळे ही भंगारातील वाहने हटवून पालिकेच्या जागेत ठेवण्यात आली आहेत.

- रितेश नाईक, नगराध्यक्ष, फोंडा पालिका

जारी केली होती नोटीस

फोंडा पालिका क्षेत्रातील बावीसपेक्षा जास्त भंगारातील वाहने इतस्ततः जागा मिळेल तेथे पार्क करण्यात आली होती. ही वाहने हटवण्यासाठी पालिकेने नोटीस जारी केली होती. त्यासाठी वाहतूक पोलिसांचे सहकार्य घेण्यात आले. या नोटिसीनुसार काही मालकांनी आपली भंगारातील वाहने हटवली होती. मात्र, बहुतांश वाहने तशीच पडून असल्याने शेवटी फोंडा पालिकेने कारवाई सुरू केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: गोवा होणार देशातले पहिले 'Air Sea Tourism Hub'! मुंबईतील परिषदेत खवंटेंचे सूतोवाच; ‘ओपन स्काय पॉलिसी’ची केली मागणी

Goa Politics: खरी कुजबुज; शिक्षकांना हवी सेवानिवृत्ती वयात वाढ!

Goa Politics: 'गोव्यात हुकूमशाही अन् जंगल राज'! LOP आलेमाव यांचा घणाघात; ‘संविधान बचाव अभियाना'त डिचोलीत जागृती

Goa Beaches: गोवा किनारी क्षेत्राबाबत नवी अपडेट! व्यवस्थापन आराखडा डिसेंबरमध्ये; मच्छीमार वस्तीमध्ये साकारणार पर्यटन प्रकल्प

Ro Ro Ferryboat: 4 बोटींचे काम रो-रो फेरीबोट करणार, 14 जुलैपासून गोमंतकीयांच्या सेवेत; जाणून घ्या 'या' सेवेची वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT