Municipal Corporation Chandigarh Dainik Gomantak
गोवा

Chandigarh: गोवा दौऱ्यावरून चंदीगड महापालिकेत गदारोळ; आपचे 8 नगरसेवक निलंबित

मार्शल्सनी आपच्या नगरसेवकांना उचलून बाहेर काढले.

गोमन्तक डिजिटल टीम

चंदीगड महापालिकेच्या 325 व्या सभेत मंगळवारी मोठा गदारोळ झाला. पत्रकार परिषदेत दिलेल्या निवेदनावरून महापौर अनूप गुप्ता यांनी आम आदमी पक्षाच्या 8 नगरसेवकांना सभागृहाच्या बैठकीतून निलंबित केले. यानंतर उर्वरित पाच नगरसेवकांनीही सभेवर बहिष्कार टाकला.

महिनाभरापूर्वी आम आदमी पक्षाने महापालिका नगरसेवकांच्या गोवा दौऱ्याबाबत पत्रकार परिषद घेतली होती. यात टूर कौन्सिलर्सना लाच देण्यासह भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले होते.

याप्रकरणी भाजपने मंगळवारी आम आदमी पक्षाच्या आठ नगरसेवकांनी माफी मागावी अशी मागणी केली. या नगरसेवकांनी माफी न मागितल्यास या सर्वांचे निलंबन करण्यात येईल, असे महापौरांनी स्पष्ट केले.

दरम्यान, खासदार किरण खेर यांनी गेल्या बैठकीत आम आदमी पक्षाच्या नगरसेवकाला शिवीगाळ केली होती, आधी त्यांनी माफी मागावी. अशी भूमिका आम आदमी पक्षाने घेतली. या प्रकरणावरून सभागृहात गदारोळ झाला. अखेर महापौर अनूप गुप्ता यांनी आठही नगरसेवकांना निलंबित केले. मार्शल्सनी आपच्या नगरसेवकांना उचलून बाहेर काढले.

आपच्या नगरसेविका लड्डी यांना मार्शल बाहेर घेऊन जात असताना विरोध करत लड्डी यांनी त्यांना मारहाण केली. तसेच, पाण्याच्या बाटल्या फोडल्या. याशिवाय नगरसेवक प्रेम लता यांनी बांगड्या काढून महापौरांच्या टेबलावर फेकल्या. त्यानंतर आम आदमी पक्षाच्या उर्वरित पाच नगरसेवकांनी स्वत:हून आपल्या जागेवरून उठून सभागृहावर बहिष्कार टाकला.

काय आहे प्रकरण ?

चंदीगड महापालिकेच्या नगरसेवकांनी नुकताच गोव्याचा दौरा केला. गोव्यातील कचरा प्रकल्पाला भेट देऊन तेथील कार्यपद्धती समजून घेणे, हा या दौऱ्यामागचा उद्देश होता. चंदीगड महापालिका त्यांच्या कार्यक्षेत्रातील डड्डू माजरा येथे कचरा प्रकल्प उभारत आहे. त्याबाबत स्पष्टता यावी, यासाठी हा दौरा झाला होता.

या दौऱ्यानंतर महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chit Celebration Ban: IPL मध्ये 'पर्ची सेलिब्रेशन'वरून मोठा राडा! माजी क्रिकेटपटू भडकला, थेट 'BCCI' कडे केली 'ही' मोठी मागणी

Viral video: विदेशी तरूणीनं पहिल्यांदाच खाल्लं भारतीय 'पान'; रिएक्शन पाहून नेटीझन्सना हसू आवरेना, व्हिडिओ व्हायरल!

NEET Paper Leak: आता उघडणार सर्व गुपितं! बॉटनी प्रोफेसर मनीषा मंधारेला 14 दिवसांची 'CBI' कोठडी; मथुरेतून झाली होती अटक

Goa Drowning Death: बुडून मृत्यू की घातपात? कुळे येथील दूधसागर नदीत मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू

Goa House Fire: मयते-अस्नोडा येथे भीषण आग; घराची स्टोअर रूम जळून खाक, 3 लाखांचे सामान भस्मसात

SCROLL FOR NEXT