CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

वनहक्क दावे निकाली काढू! : मुख्यमंत्री

कुळ मुंडकार प्रकरणेही धसास लावणार; पाच वर्षांची मुदत

दैनिक गोमन्तक

फोंडा : गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेले किमान पाच हजार वनहक्क दावे येत्या पाच वर्षांत निकाली काढण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. कुळ-मुंडकार कायद्यासंबंधी अजूनही बरेच लाभार्थी अनभिज्ञ असून स्वतःच्या हक्काचीही या लोकांना जाणीव नाही. त्यामुळे जागे व्हा आणि आपला हक्क मागून घ्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

फोंड्यातील राजीव गांधी कलामंदिरात आज (शुक्रवारी) गोमंतक बहुजन महासंघातर्फे आयोजित केलेल्या ओबीसी, एससी, एसटी या बहुजन समाजातील आमदारांच्या सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्री सावंत बोलत होते.

राज्यात वन हक्क निवासी कायद्याची अंमलबजावणी म्हणावी तशी झालेली नाही. सद्यस्थितीत वन हक्क दाव्याची 10 हजार प्रकरणे प्रलंबित असून मागच्या तीन वर्षांत मंत्री गोविंद गावडे यांच्या सहकार्याने 500 प्रकरणे आपण निकाली काढली, असे सावंत म्हणाले. आता येत्या पाच वर्षांत किमान पाच हजार प्रकरणे निकाली काढताना कुळ-मुंडकार प्रकरण शिल्लक राहणार नाही, यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी (CM) दिली.

भारताचे संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवतेचा धर्म जोपासला. आंबेडकर यांची जयंती साजरी करताना हाच मानवतेचा धर्म पुढे नेताना चातुर्वर्ण्य बाजूला सारून पुढे जाण्याचा प्रयत्न करूया, असे आवाहन सावंत यांनी केले.

पंतप्रधान मोदी यांच्या निर्देशानुसार आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोव्याची (Goa) वाटचाल सुरू आहे. प्रत्येक पंचायतीत स्वयंमित्र भेट देऊन विविध योजना मार्गी लावण्यासाठी कार्यरत आहेत. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभत आहे.

गोमंतकीयांना सरकार सुविधा पुरवण्यासाठी पुढाकार घेऊन योग्य कार्यवाही करीत असल्याने काही लोकांना खुपते, अशी टीका सावंत (Pramod Sawant) यांनी नाव न घेता केली. मूळ गोमंतकीयांना त्यांचे न्याय्य हक्क देण्यासाठी आडकाठी आणणाऱ्या लोकांना बाजूला सारून मूलभूत सुविधा पुरवण्यावर भर देण्याचा सरकारचा संकल्प आहे, असे सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

NSUI: बालरथांचे 'सुरक्षा ऑडिट' करावे! 'एनएसयूआय' आक्रमक, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नको

Panaji: महापालिकेचा माणुसकीचा हात! बेघर आणि भिकाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी सुरू केली विशेष हेल्पलाईन

Goa Congress: कॅसिनोशी जोडलेल्या अवैध 'स्पा'ना संरक्षण कोणाचे? पणजीत 40 हून अधिक अवैध 'स्पा'- प्रतीक्षा खलप

Goa E20 Petrol: गोव्यात 'ई-20' पेट्रोलविरोधात 'आप' आक्रमक! इंधन निवडण्याचा अधिकार वाहनधारकांना देण्याची वाल्मिकी नाईक यांची मागणी

Goa Congress: गोव्यात काँग्रेस ॲक्शन मोडमध्ये! विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'गोवा रक्षण यात्रा'द्वारे जनसंपर्क अभियानावर मोठा भर

SCROLL FOR NEXT