Goa Viral Video Dainik Gomantak
गोवा

Goa Viral Video: अनेक वाहनांना धडक देऊन झिंगाट पर्यटकाचा शिवोलीत राडा, गाण्याच्या तालावर रस्त्यातच लागला नाचायला

Goa Viral Video: स्थानिकांसोबत थोडावेळ शाब्दिक चकमक झाल्यानंतर, चालकाने थेट स्पीकर बाहेर काढत रस्त्यावर नाचायला सुरुवात केली.

Pramod Yadav

Goa Viral Video

गोव्यात अपघातांच्या घटना असो किंवा समुद्रकिनाऱ्यांवर वाहन घेऊन जाणे अथवा वाहनांसोबत विचित्र स्टंट करण्याचे प्रकार असोत. अशा घटना वारंवार समोर येत असतात. नुकतेच शिवोलीत मुंबईच्या एका पर्यटकाने अनेक वाहनांना धडक देऊन रस्त्यातच नाचायला सुरुवात केली.

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, समिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवोली येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. तुषार नावाच्या मुंबई येथील एका पर्यटकाने विविध वाहनांना धडक दिल्यानंतर काही स्थानिकांनी त्याला रोखले.

स्थानिकांसोबत थोडावेळ शाब्दिक चकमक झाल्यानंतर, चालकाने थेट स्पीकर बाहेर काढत रस्त्यावर नाचायला सुरुवात केली. समोर आलेल्या व्हिडिओनुसार त्याच्याकडे असलेली रेंट कारचा (GA03W4735) अपघात झाल्याचे दिसत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी संबधित व्हिडिओच्या मदतीने रेंट कारच्या चालकाला पोलिस स्थानकात बोलवून त्याला चौकशीअंती सोडण्यात आले. दरम्यान, याबाबत तक्रार नोंदविण्यासाठी कोणी पुढे आले नसल्याचे पोलिस म्हणाले.

अनेकांनी याप्रकरणी पर्यटकाच्या बेजबाबदारपणावर टीका केलीय. तसेच, अनेकांनी कारवाईची मागणी केली. काही जणांनी परराज्यातील पर्यटक गोव्यात वाहतूक नियमांकडे दुर्लेक्ष करतात, असा आरोप केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanju Samson Record: 7 चौकार अन् 4 षटकार! 20 चेंडूंत वादळी अर्धशतक ठोकत संजूची हिटमॅनच्या क्लबमध्ये एन्ट्री; टीकाकारांचीही केली बोलती बंद

Goa Accident: बेदरकार मिनी बसचालकाने दुचाकीला उडवले! दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू; आके-पॉवरहाऊस मार्गावर भीषण अपघात

Goa Crime: पर्वरी गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! दुसरा मुख्य शूटर 'अन्ना' चेन्नईतून गजाआड; आतापर्यंत सहा आरोपी अटकेत

Rahu Gochar 2026: राहु बनवणार अफाट श्रीमंत! 'या' 5 राशींवर होणार पैशांचा पाऊस; राजयोगासारखे मिळणार फळ

Goa Politics: भेटींचा उत्सव, मतांचा ध्यास! गणेश चतुर्थीत राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींना उधाण; दर्शनासोबत निवडणुकीच्या समीकरणांचीही चर्चा

SCROLL FOR NEXT