Job Scam Dainik Gomantak
गोवा

Job Scam: "रेस्टॉरंटला रेटिंग द्या आणि कमवा 5 ते 8 हजार", MPच्या तरूणाने गोव्यात बसून केला स्कॅम! मुंबईच्या व्यक्तीकडून लुटले 6 लाख

Crime News: पोलिसांनी गोव्यातून एका २३ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. त्याने टेलिग्रामद्वारे टास्क फ्रॉड करून मुंबईतील व्यक्तीकडून तब्बल ६ लाख रुपये लुबाडले.

Sameer Amunekar

मुंबई: सोशल मीडियावर नोकरी किंवा गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळ्यांपासून सावध राहा, असं वारंवार पोलिसांकडून सांगितलं जातं. दरम्यान, अशाच एका घटनेत ओशिवरा पोलिसांनी गोव्यातून एका २३ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. त्याने टेलिग्रामद्वारे टास्क फ्रॉड करून मुंबईतील व्यक्तीकडून तब्बल ६ लाख रुपये लुबाडले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव अमन परमार, मूळचा इंदूर (मध्य प्रदेश) येथील आहे. त्याला गोव्यातील कळंगुट परिसरातून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी आरोपीकडून एक मोबाईल फोन आणि दोन सिमकार्ड जप्त केली आहेत.

फसवणुकीची सुरुवात कशी झाली?

जोगेश्वरीत राहणारा पीडित व्यक्ती चप्पल बनवणाऱ्या कारखान्यात सुपरवायझर म्हणून काम करतो. त्याला टेलिग्रामवर “ऑनलाइन रेस्टॉरंट रेटिंग द्या आणि दररोज ५,००० ते ८,००० रुपये कमवा.” असा मेसेज आला.

सुरुवातीला लोभी होऊन पीडिताने सूचनांप्रमाणे काम केले आणि पहिल्या टप्प्यात त्याला १८० रुपये मिळाले. यामुळे विश्वास बसला आणि त्याने आणखी काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याला बनावट एनएसई गुंतवणूक प्लॅटफॉर्मसारखी दिसणारी लिंक देण्यात आली. सुरुवातीला त्याला बक्षीस म्हणून १८० रुपये मिळाले. यामुळे त्याला त्या व्यक्तीवर विश्वास बसला. त्याला पटवून देण्यासाठी त्यात बनावट बॅलन्स देखील दाखवण्यात आला.

६ लाख रुपयांचा गंडा

फसवणूक करणाऱ्यांनी गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळेल या बहाण्याने पीडिताला सतत पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. गुगल पे आणि फोनपे द्वारे त्याने एकूण ₹६,०९,८८४ पाठवले. मात्र पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यावर वेबसाइट काम करेनाशी झाली. मोबाईलही स्विच ऑफ झाल्यानंतर त्याला फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

यानंतर पीडित व्यक्तीने फसवणूक करणाऱ्या एजंटशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनेक वेळा संपर्क करूनही त्याने फोन उचलला नाही आणि अखेरीस त्या व्यक्तीनं मोबाईल स्विच ऑफ केला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने ओशिवरा पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपास करून आरोपीचा ठावठिकाणा गोव्यात लावला आणि अटक केली.

सोशल मीडिया वापरताना अज्ञात प्रोफाइल, ग्रुप किंवा चॅनेलमध्ये सामील होऊ नका. टेलिग्राम, इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअॅपवर आलेल्या कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका आणि अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या फाइल्स डाउनलोड करण्याचे टाळा.

गुंतवणूक किंवा नोकरीच्या ऑफरमध्ये जास्त परतावा मिळेल या लोभात येऊन कधीही फी, नोंदणी शुल्क किंवा अॅडव्हान्स ट्रेडिंग मनीच्या नावाखाली पैसे पाठवू नका. तसेच, सोशल मीडियावरून आलेल्या कोणत्याही लिंकद्वारे उघडलेल्या अॅप किंवा वेबसाईटवर तुमची बँकिंग किंवा वैयक्तिक माहिती भरू नका. जर तुमची फसवणूक झाल्याचे लक्षात आले, तर त्वरित सायबरक्राईम हेल्पलाईन क्रमांक १९३० वर कॉल करून तक्रार नोंदवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

Border 2 Teaser: 'लाहोरपर्यंत आवाज गेला पाहिजे...' पाकिस्तानला धडकी भरवणारा बॉर्डर 2 चा टीझर रिलीज; देओलचा रुद्र अवतार पाहून व्हाल अवाक VIDEO

SCROLL FOR NEXT