Mumbai Goa Vande Bharat Train Dainik Gomantak
गोवा

Vande Bharat Train: मोठी बातमी! मुंबई गोवा वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन लांबणीवर, 'हे' आहे कारण

Pramod Yadav

Mumbai Goa Vande Bharat Train: मुंबई गोवा वंदे भारत सेमी हायस्पीड ट्रेनचे होणारे उद्घाटन पुढे ढकलण्यात आले आहे. हावडाहून चेन्नईला जाणाऱ्या कोरोमंडल एक्सप्रेसला शुक्रवारी संध्याकाळी मोठा अपघात झाला. यामध्ये सुमारे 30 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, तर सुमारे 300 प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शनिवारी मडगाव येथे होणाऱ्या वंदे भारत सेमी हायस्पीड ट्रेनचे उद्घाटन पुढे ढकलण्यात आले आहे.

(Mumbai Goa Vande Bharat Train Inauguration postponed)

मुंबई गोवा वंदे भारत सेमी हायस्पीड ट्रेनचे उद्घाटन शनिवारी (दि.02 जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी आभासी पद्धतीने करणार होते. मडगाव येथून सुटणाऱ्या या ट्रेनला मोदी ऑनलाईन पद्धतीने सकाळी 09.30 वा हिरवा झेंडा दाखवणार होते.

दरम्यान, हावडाहून चेन्नईला जाणाऱ्या कोरोमंडल एक्सप्रेसला शुक्रवारी संध्याकाळी मोठा अपघात झाला. या अपघातात सुमारे 30 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर 300 प्रवाशी गंभीर जखमी आहेत. अशी माहिती समोर आली असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

या डब्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी अडकल्याची माहिती मिळाली आहे, ज्यांना वाचवण्यासाठी स्थानिक लोक एकवटले आहेत. ही ट्रेन चेन्नई सेंट्रल ते कोलकात्याच्या शालीमार रेल्वे स्थानकापर्यंत धावते.

ओडिशातील बालासोरजवळ शुक्रवारी संध्याकाळी कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की ट्रेनचे 18 डबे रुळावरून घसरले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT