Mumbai-Goa Highway  Dainik Gomantak
गोवा

Mumbai-Goa Highway: कंत्राटदाराचं आडमुठं धोरण; आक्रमक गावकऱ्यांनी रोखले मुंबई-गोवा महामार्गचे चौपदरीकरणाचे काम!

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पुन्हा थांबण्यात आले आहे. मागील कित्येक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार हा प्रश्नच आहे.

Manish Jadhav

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम थांबण्यात आले आहे. मागील कित्येक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार हा प्रश्नच आहे. कित्येक सरकारे आली आणि गेली मात्र या महामार्गाचे काम पूर्ण करण्यात कोणीच रस घेतला नाही.

गोवे गावाकडे जाणारा रस्ता बंद!

रोहा तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरुन गोवे गावाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला. ठेकेदाराने दाखवलेल्या आडमुठेपणामुळे हा रस्ता बंद करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हा रस्ता बंद झाल्याने कोलाडकडून गोवे, पुईकडे जाणाऱ्या लोकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. गोवे, पुईतील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय महामार्गाचे काम करु देणार नाही अशा ठेकेदाराला ग्रामस्थांनी तंबी दिली. एवढ्यावरच न थांबता रस्त्याचे काम तात्काळ बंद केले.

ठेकेदाराला आता जाग आली

दरम्यान, महामार्ग 66 वरील चौपदरीकरणाच्या कामाला 17 वर्षे पूर्ण झाली. परंतु कोलाडमधील रस्ता बनवण्यासाठी ठेकेदाराला आता जाग आली का? असा सवाल यावेळी ग्रामस्थांनी केला. याशिवाय, मुंबई-गोवा महामार्गासाठी (Mumbai-Goa Highway) संपादित करण्यात आलेल्या जमीनीचे मार्किंग केले नाही, अशा अनेक मागण्यांसाठी गोवे पुई गावातील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

SCROLL FOR NEXT