Mumbai Goa Highway Viral Video Dainik Gomantak
गोवा

Viral Video: मुंबई-गोवा महामार्गावर महाड येथे संरक्षण कठडा कोसळला, थरारक व्हिडीओ समोर

Pramod Yadav

Mumbai Goa Highway Viral Video

मुंबई-गोवा महामार्गावर महाड येथे संरक्षक कठडा कोसळल्याची घटना समोर आली आहे. महाड शहर परिसरातील शेडाव नाका येथे ही घटना घडली. घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. सुदैवाने यावेळी महामार्गावरून कोणतेही वाहने जात नसल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही.

महाड परिसरातील विसा नदीजवळ नव्याने हा रस्ता बांधण्यात आला होता. दरम्यान, मुसळधार पावसामुळे रस्त्याचा भाग कोसळला.

घटनास्थळी उपस्थित लोकांनी रस्ता कोसळल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

इर्शाळवाडीत दरड कोसळल्याने संपूर्ण वस्तीसह 48 कुटुंबे ढिगाऱ्याखाली

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शालवाडी गावात एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका वस्तीवर दरड कोसळली.

रात्री झोपेत असताना ही घटना घडल्यामुळे अनेकांना स्वताला वाचवता आले नाही. त्यामुळे ढिगाऱ्यात 48 कुटुंबातील 120 हून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मध्यरात्री झालेल्या अपघातानंतर बचावकार्य सुरू असून आतापर्यंत पाच ते सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच, एकूण 27 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. यामध्ये दोन ते तीन लहान मुलांचाही समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT