Mumbai Goa Highway Dainik Gomantak
गोवा

चांद्रयान 3 ने टिपलेले चंद्राचे पहिले काही फोटो! मुंबई-गोवा हायवेबाबत मराठी अभिनेत्याचे ट्विट व्हायरल

मुंबई - गोवा महामार्गाचे काम मागील 12 वर्षांपासून रखडले आहे.

Pramod Yadav

Mumbai Goa Highway: मुंबई - गोवा महामार्गाचे काम मागील 12 वर्षांपासून रखडले आहे. महामार्गात मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या खड्यांमुळे प्रवाशांना अतोनात हाल सहन करावे लागत आहेत. राजकीय नेते, पुढारी, स्थानिक नागरिक ते मार्गावरील नियमित प्रवाशांनी या रस्त्याची बिकट अवस्था वारंवार दाखवली आहे.

मराठीतील आघाडीचा अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे याने नुकतेच मुंबई-गोवा महामार्गाबाबत मजेशीर ट्विट केले आहे. हेमंतचे ट्विट सध्या चांगलेच चर्चेत आहे.

गोवा ते मुंबईला जोडणारा महामार्ग कोकणात येण्यासाठी आणि येथून मुंबईला जाण्यासाठी महत्वाचा मार्ग आहे. पण, महामार्गावरील खड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. यापूर्वी अनेक संतप्त प्रवाशांनी प्रवासात होणाऱ्या त्रासाचे कथन व्हिडिओ तसेच, लिखित संदेशाच्या माध्यमातून केले आहे.

अशात आता मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे याने महामार्गाबाबत ट्विट केले आहे.

"चांद्रयान ३ ने टिपलेले चंद्राचे पहिले काही फोटो! आता आपल्या रागाचं रूपांतर स्वतःचीच थट्टा करण्यात होत चाललं आहे!! भीषण!" असे ट्विट हेमंत ढोमेने केले आहे.

हेमंत ढोमेच्या या ट्विटवर अनेकांच्या मजेशीर कमेन्ट देखील आल्या आहेत. एका युझरने 'विद्यमान आमदारांनी एका वर्षात महामार्ग पूर्ण करण्याची शपथ घेतली आहे.' अशी कमेन्ट केली आहे. ढोमे यांनी याला, 'अशा अनेक शपथा, अनेक वचनं गेली अनेक वर्ष आपण ऐकतोच आहोत! कुठल्याही पक्षाने, कुठल्याही मंत्र्याने, आमदाराने… काहीही केलेलं नाही!' असे उत्तर दिले आहे.

तसेच, आणखी एका युझरने रस्त्यात अडकून पडलेल्या शिवशाही बसचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याला हेमंतने विनोदी उत्तर दिले आहे. 'चूक एस.टी. ड्रायव्हरची आहे… मी म्हणतो त्यांनी तळ्यात का घातली गाडी?' असे हेमंतने प्रतिक्रिया दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT