Mumbai- Goa Highway Dainik Gomantak
गोवा

Mumbai- Goa Highway: मुंबई- गोवा महामार्गावर रास्तारोको आंदोलन

मुंबई- गोवा महामार्गावर खड्डे जैसे थे आहेत.

दैनिक गोमन्तक

Mumbai- Goa Highway Latest News: मुंबई- गोवा महामार्गावर खड्ड्यांविरोधात रास्तारोको आंदोलन सुरू आहे. ज्यामुळे वाहतुक कोंडी झाली आहे. या महामार्गावरील खड्डे जैसे थे आहेत. या आंदोलनात यमराजाच्या वेशात रस्त्यावरील खड्ड्याविरोधात आपले मत मांडले.

गेल्या 12 वर्षा पासून या रस्त्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. 'माझं पेण' या सामाजिक संघटनेकडून रस्त्यावरील खड्ड्याच्या दुरवस्थेविरोधात रास्तारोको आंदोलन करण्यात आले आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे. या आंदोलनात पेणचे सर्व नागरिक सहभागी झाले आहेत. मुदतीपुर्वी या रस्त्याचे काम पुर्ण करण्याची मागणी पेणच्या नागरिकांनी केली आहे.

या आंदोलनात यमराजाच्या वेशात रस्त्यावरील खड्ड्याविरोधात आपले मत मांडले. आंदोलनात सहभागी झालेल्या पेणच्या नागरिकांनी या महामार्गाचे काम लवकरात लवकर पुर्ण करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी या रस्त्यावरून खड्डे चुकवत एक तरुण बाईकवरुन जात होता. एका अवजड वाहनाच्या चाकांखाली हा अचानक आला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. काही संतप्त नागरिही घटनास्थळी जमा झाले होते आणि त्यांनी या खड्ड्यांमुळेच तरुणाचा मृत्यू झाल्याचा आक्षेप घेत, मुंबई-गोवा हायवेवरच रास्तारोको सुरु केला होता.

दरम्यान, गेले अनेक काळापासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरु आहे. या रस्त्यावरुन प्रवास करताना मुठीत जीव घेऊनच प्रवास करावा लागतो. याकडे सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात येते आहे. संतप्त नागरिकांनी त्या ठिकाणी ठेकेदार आणि सरकारचा निषेध केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Factory Fire: नेसाई औद्योगिक वसाहतीतील फॅक्टरीला भीषण आग! अग्निशमन दलाच्या तत्परतेने वाचली 10 लाखांची मालमत्ता; मोठा अनर्थ टळला

Horoscope: पैशांचा पाऊस! डिसेंबर महिना 'या' 4 राशींसाठी लकी; प्रत्येक इच्छा पूर्ण होणार, धनलाभ निश्चित

Goa ZP Elections: 'कमळ' फुलवण्यासाठी 'त्रिसूत्री' रणनीती! मित्रपक्ष मगोसह अपक्षांनाही संधी; मुख्यमंत्र्यांना विजयाची खात्री

Crime News: गर्लफ्रेंडनं मोडलं 'वचन'! खर्च करणारा प्रियकर बनला खुनी; दुसऱ्याशी लग्न ठरल्यानं थेट घरात घुसून झाडली गोळी

Goa Politics: 'नियमांचे पालन न केल्यास पोलीस कारवाई करणारच', सरदेसाईंच्या सभेवरील कारवाईवर रमेश तवडकरांचा सणसणीत टोला

SCROLL FOR NEXT