Bicholim  Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : मुळगावात बालसंस्कार शिबिर उत्साहात; मुलांनी लुटला आनंद

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News :

डिचोली, मुळगाव येथे आयोजित केलेल्या बालसंस्कार शिबिराची उत्साहात सांगता झाली. लाटंबार्से सम्राट क्लबतर्फे शिवलकरवाडा - मुळगाव येथील श्री राष्ट्रोळी ब्राह्मण मंदिर सभागृहात आयोजित केलेल्या या शिबिराला समाधानकारक प्रतिसाद मिळाला.

या शिबिरात प्रशिक्षक दशरथ मोरजकर, बाबनी मापारी आणि स्नेहा गावस यांनी शिबिरातील सहभागी मुलांना विविध गाणी, खेळ आणि गोष्टी या माध्यमातून संस्काराचे महत्त्व सांगितले. सहभागी मुलांनी शिबिराचा आनंद लुटला.

प्रमुख पाहुणे तथा लाटंबार्सेचे जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्‍घाटन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर मुळगावचे उपसरपंच गजानन मांद्रेकर, पंच सदस्य सुहासिनी गोवेकर, लाटंबार्से सम्राट क्लबचे अध्यक्ष तुळशीदास शिरोडकर, उपाध्यक्ष अवधूत नाईक, मुकूंद लामगावकर, कार्यक्रम प्रमुख किर्ती वांगणकर, सचिव निर्मला शिरगावकर आणि शिबिर प्रशिक्षक उपस्थित होते.

बालवयात होणारे संस्कार पुढील जीवनात मार्गदर्शक ठरतात, असे मत प्रदीप रेवोडकर यांनी व्यक्त केले. समारोप सोहळ्यात सहभागी मुलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. सूत्रसंचालन किर्ती वायंगणकर आणि निर्मला शिरगावकर यांनी केले. तुळशीदास शिरोडकर यांनी आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT