Goa News : सुरावली येथील रस्त्यातील दोष दूर करा : वेन्झी व्हिएगस

Goa News : मेणबत्ती जागरण रॅली ः नावेली अपघातातील मृताला अभिवादन
Goa N
Goa NDainik Gomantak

Goa News :

सासष्टी, या आठवड्याच्या सुरवातीला नावेली येथील एका युवकाचे सुरावली रस्त्यावर अपघाती निधन झाले होते. त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी सुरावली स्थानिकांनी मेणबत्ती रॅलीचे आयोजन केले व त्याच बरोबर रस्त्यातील दोष दूर करण्याची मागणी केली.

सुरावली येथील भुयारी रस्त्यापर्यंत जाण्याची वाट दुरुस्त करावी, अशी त्यांची मागणी आहे. याच जागेवर जास्त अपघात होतात, असे त्यांचे म्हणणे आहे.

या पूर्वी स्थानिकांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांकडे मागणी केली होती. या रस्त्यातील दोष दूर करण्यासाठी कोकण रेल्वे, सार्वजनिक बांधकाम खाते व इतर सरकारी खात्यांकडे संपर्क साधला पण त्याचा काहीच उपयोग होत नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी २०२२ पासून होत आहे.

Goa N
Goa's Top News: दूधसागर, बाणावली जिल्हा पंचायत पोटनिवडणूक, अपघात; राज्यातील ठळक बातम्या

या मेणबत्ती जागृती रॅलीत बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगस हेही सहभागी झाले होते.

जर स्थानिकांनी केलेल्या मागणीची योग्य दखल सरकारी खात्यांनी घेतली असती तर अपघात टळले असते, असे व्हिएगस यांनी सांगितले. बाणावली येथील मेर्काडो मॉल जवळील रस्त्याकडे सुद्धा सार्वजनिक बांधकाम खाते हीच चूक करीत आहे. तिथे रस्त्याच्या बाजूला नाला बांधण्यात येत आहे.

सुरावली पंचायतीनेही ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे, असे सामाजिक कार्यकर्ते सांतोलिनो रॉड्रिग्स याने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com