Mulgao Protest Public Meeting Dainik Gomantak
गोवा

Mulgao mining: मुळगावात खाणविरोधातील लढा संघटितपणे तीव्र करण्याचा निर्धार; जाहीर सभेत गावकऱ्यांची वज्रमूठ!

Mulgao Protest Public Meeting: खाणविरोधातील लढा संघटितपणे तीव्र करण्याचा निर्णय मुळगाव येथे झालेल्या जाहीर सभेत घेण्यात आला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

डिचोली: खाणविरोधातील लढा संघटितपणे तीव्र करण्याचा निर्णय मुळगाव येथे झालेल्या जाहीर सभेत घेण्यात आला. त्यासाठी खाणपट्टा भागातील गावोगावी जनजागृती करण्याचेही ठरविण्यात आले. डिचोली तालुक्यातील खाणपट्टा भागातील खाणग्रस्त नागरिकांची जाहीर सभा शनिवारी मुळगाव येथील श्री केळबाई मंदिरात आयोजित करण्यात आली होती.

मुळगावच्या सरपंच सुहासिनी गोवेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला पर्यावरण अभ्यासक रमेश गावस, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर, मुळगाव देवस्थानचे अध्यक्ष कृष्णनाथ परब, शेतकरी संघटनेचेअध्यक्ष प्रकाश परब, सभेचे निमंत्रक सचिन मयेकर तसेच सामाजिक कार्यकर्ते आनंद गाड आदी उपस्थित होते.सरकार हे खाणमालकांच्या हातातील बाहुले बनले असून, त्यामुळेच खाणमालकांचे लाड होत आहेत आणि त्यांना हवे ते सरकारकडून मिळत आहे, असा आरोप पर्यावरण अभ्यासक रमेश गावस यांनी केला.

सचिन मयेकर यांनी खाणोंमुळे जनतेला कोणते परिणाम भोगावे लागत आहेत, याबाबत माहिती दिली. यावेळी वसंत गाड, प्रकाश परब, संकटातून मुक्त करा सरकारला कोटी रुपये दान देण्याऐवजी 'वेदांता'ने खाणी बंद करून जनतेला संकटातून मुक्त करावे, अशी मागणी पर्यावरण अभ्यासक रमेश गावस यांनी यावेळी केली. स्वप्नेश शेर्लेकर तसेच अडवलपाल येथील आनंद गाड यांनीही विचार मांडले. सरकारला जनतेच्या सुखदुःखाचे काहीच पडलेले नसून उलट खाण कंपन्यांचेच लाड करण्यात येत आहेत, असा आरोप वक्त्यांनी करत सरकारवर टीका केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

SCROLL FOR NEXT