MP funded projects in Margao are ineffective  Dainik Gomantak
गोवा

मडगावात खासदार निधीतून उभारलेले प्रकल्प कुचकामी

योजनेत दुरुस्तीची तरतूद नाही

दैनिक गोमन्तक

मडगाव : खासदार क्षेत्र विकास निधीतून (एमपीएलएडी) उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पांची देखभाल व दुरुस्तीसाठी त्या योजनेत कोणतीच तरतूद नसल्याने असे अनेक प्रकल्प कुचकामी ठरू लागले आहेत.

दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी आपल्या गत म्हणजे 2014 मध्ये संपलेल्या खासदारकीच्या कारकिर्दीत मडगावात स्थानिक नगरपालिकेच्या विनंतीवरून मंजूर केलेले तीन प्रकल्प सध्या कुचकामी ठरल्याचे दिसून येत आहेत.

यात शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे, हॉस्पिसियोजवळून मॉन्तहिलवर जाणाऱ्या वाटेवर बांधलेल्या पायऱ्या व जुन्या बाजारांतील दिवाणी न्यायालयासमोरील उद्यानाचा समावेश आहे. ते प्रकल्प उभारले गेले, पण कोणीच त्यांची देखभाल केली नाही. त्यामुळे त्यावर झालेला खर्च पाण्यातच गेल्यासारखा आहे.

सदर योजनेत एकरकमी खर्च करता येतो पण देखभालीची तरतूद नाही. खासदार सार्दिन यांच्या मते ही देखभाल पालिका, जिल्हा पंचायत वा पंचायतींनी करावी, असे अभिप्रेत आहे. पण प्रत्यक्षात तसे होत नाही. या संस्था प्रकल्पांची विनंती करतात, नंतर त्यांची जबाबदारी पत्करत नाहीत.

सीसीटीव्हींकडे दुर्लक्ष; पुन्हा प्रस्ताव

मडगाव नगरपालिकेने सार्दिन यांच्या यापूर्वीच्या खासदार निधीतून एकदा सीसीटीव्ही कॅमेरे बसवले व नंतर देखभाल- दुरुस्ती अभावी ते निकामी झाल्यावर आता पुन्हा त्यांच्याकडे अशा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावामुळे आधीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे काय झाले, हाही प्रश्‍न चर्चेत आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT