Calangute Congress Committee Dainik Gomantak
गोवा

कळंगुटमध्‍ये ‘काँग्रेस हटाव’ मोहीम

लोबोंविरोधात राजीनामास्त्र, गट समितीही बरखास्त

दैनिक गोमन्तक

कळंगुट : काँग्रेसच्या वरिष्ठांनी जनतेच्या भावनांची कदर करता येत नाही. स्थानिक गट समितीला विश्वासात न घेताच माजी मंत्री मायकल लोबो यांना पक्षात घेतले आहे. या कृतीचा निषेध करीत कळंगुट काँग्रेस गट समिती बरखास्त करीत गटाध्यक्षांसह समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सादर केले.

कॉंग्रेसच्या (Congress) स्थानिक नेत्यांनी बुधवारी कळंगुटमध्ये पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला. तसेच पासून कॉंग्रेस ‘हटाव-गोवा बचाव’चा नारा घराघरात पोहोचविण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. येत्या विधानसभेची निवडणूक एक तर अपक्ष अथवा अन्य पक्षाच्या तिकिटावर लढवली जाईल. मात्र, याबाबत ठोस निर्णय उद्यापर्यंत घेण्यात येईल. वेळप्रसंगी ‘आप’चे (AAP) उमेदवार सुदेश मयेकर यांना बाहेरून पाठिंबा देण्याचा विचार सुरू असल्याचेही फर्नांडिस यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर कळंगुटचे माजी आमदार तथा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आग्नेलो फर्नांडिस, माजी सरपंच जोसेफ सिक्वेरा, अँथनी मिनेझिस, गटाध्यक्ष बेनेडिक्ट डिसोझा तसेच इतर सदस्य उपस्थित होते.

कॉंग्रेसचे केंद्रीय नेते गोव्यात माया गोळा करण्यासाठी येतात. ज्यांच्याकडून अधिक फायदा होतो, अशा लोकांशीच तिकीट वाटपाचा ‘व्यवसाय’ केला जातो, अशी टीका जोसेफ सिक्वेरा यांनी केली. सध्याची काँग्रेस ही गांधी-नेहरूंची कॉंग्रेस राहिलेली नाही. प्रामाणिक कार्यकर्त्यांचा, ज्‍यांनी पक्ष मोठा करण्‍यासाठी काबाडकष्‍ट केले अशा लोकांना या पक्षात अलीकडे न्‍याय मिळत नाही. त्‍यामुळे नाईलाजाने आम्‍हांला काँग्रेसविरोधात पावले उचलावी लागत आहेत, असेही सिक्वेरा यांनी सांगितले.

दिगंबर कामत-भाजप यांच्यात छुपा करार!

राज्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शहा यांच्यात झालेल्या छुप्या करारानुसार काँग्रेसकडून निवडून येणारे आमदार शेवटी भाजपमय होणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यामुळे मंगळवारी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या मायकल लोबो यांना मत देणे याचा अर्थ अप्रत्यक्षरित्या भाजपलाच (BJP) मत देण्यासारखे असल्याचे फर्नांडिस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: आकाशात इंजिननं घेतला पेट अन् 272 प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला! डेल्टा एअरलाईन्सच्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग

हल्लेखोरांनी कार अडवली अन् 'शेलीं'ना ओढत नेलं, बगदादमध्ये भरदिवसा अमेरिकन महिला पत्रकाराचं अपहरण; सुरक्षा यंत्रणांकडून हाय अलर्ट

Ketu Nakshatra Parivartan: मघा नक्षत्रात केतुचं गोचर! 'या' 4 राशींसाठी 5 डिसेंबरपर्यंतचा काळ आव्हानात्मक; अचानक उद्भवणाऱ्या समस्यांमुळे आर्थिक गणित कोलमडणार

VIDEO: "आम्ही तयार आहोत, हिम्मत असेल तर समोर या" इराणी लष्कराचा थरारक सराव अन् अमेरिकेला थेट धमकी; व्हिडिओ होतोय व्हायरल

Goa Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य संशयितांना मोठा दिलासा! लुथरा बंधूंना म्हापसा सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT