Crime Dainik Gomantak
गोवा

Crime News : मुरगावात चोरांकडून तिसरी शाळा लक्ष्य

Crime News : कर्मचाऱ्यांनी याची माहिती आपल्या वरिष्ठांना दिली व लगेच वास्को पोलिसांना याविषयी कळयविण्यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

Crime News :

वास्को, दाबोळी येथील केशव स्मृती शाळेत सोमवार, ११ रोजी चोरीची घटना घडली. सुमारे ५० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. मुरगाव तालुक्यातील ही तिसरी शाळा आहे, जिला चोरट्यांनी लक्ष्य केले.

मिळालेल्या माहितीनुसार, दाबोळी येथील केशव स्मृती शाळेत चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.

जेव्हा कर्मचारी शाळा उघडण्यासाठी शाळेत आले तेव्हा कर्मचाऱ्यांना कुलूप उघडलेले दिसले आणि मुख्य कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याचे नजरेस पडले. तसेच मुख्याध्यापकांच्या कार्यालयातील कागदपत्रे अस्ताव्यस्त पडलेली दिसली. कर्मचाऱ्यांनी याची माहिती आपल्या वरिष्ठांना दिली व लगेच वास्को पोलिसांना याविषयी कळयविण्यात आले.

वास्को पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. सुमारे ५० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली असल्याचे मुख्याध्यापिका सुषमा कोरगावकर यांनी सांगितले. शाळेला रात्रीची सुरक्षा पुरवावी, अशी विनंती शिक्षण विभागाला मुख्याध्यापिका सुषमा कोरगावकर यांनी केली आहे. वास्को पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dharmendra Passes Away: सिनेसृष्टीवर शोककळा! ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 89व्या वर्षी निधन

Goa Crime: बागा-हडफडे परिसरात दोघांवर कोयत्याने हल्ला; एक ताब्यात

गोव्यात 'दरोड्याचे भय' दिवसेंदिवस! 'भिवपाची कांयच गरज ना' म्हणणाऱ्या CM प्रमोद सावंतांच्या आश्वासनावर प्रश्नचिन्ह

अग्रलेख; पंतप्रधान मोदींची भविष्यवाणी: काँग्रेस पक्षात मोठे विभाजन होणार? राहुल गांधींच्या नेतृत्त्वाची अग्निपरीक्षा!

'हात लावेन तेथे सोने' करण्याची धमक दाखवलेल्या 'भाजप'ला हरवण्यासाठी विरोधकांना 'एकी'चा मंत्र हवा! - संपादकीय

SCROLL FOR NEXT