Mormugao Port Goa Dainik Gomantak
गोवा

Mormugao Port: गोव्यात क्रूझ पर्यटन हंगाम सुरू; एकाच दिवशी कॉर्डेलिया आणि जर्मनीहून जहाजं दाखल

Goa Tourism News: लवकरच गोवा भारतातील पश्चिम किनाऱ्यावरील पर्यटनाचे केंद्र बनण्याची शक्यता आहे

Akshata Chhatre

वास्को: मुरगाव बंदर प्राधिकरणाने (MPA) शनिवारी (दि. 16 नोव्हेंबर) रोजी हंगामातील पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रूझ जहाज एमव्ही वास्को द गामाचे स्वागत केले. 590 प्रवासी आणि 416 क्रू सदस्य घेऊन आलेलं हे जर्मन क्रूझ सकाळी 11च्या दरम्यान गोव्यातील बंदराल येऊन लागलं आणि यामधील जवळपास 500 पर्यटकांनी गोव्याच्या पर्यटनाचा आस्वाद घेतला, यामुळे गोव्यातील पर्यटन क्षेत्राला आर्थिक हातभार लागला होता. त्यानंतर मात्र रात्री 11:30 च्या सुमारास हे जहाज कोचीमधून माघारी फिरलं.

शनिवारी केवळ जर्मन क्रूझ नाही तर 1,300 प्रवाशांसह कॉर्डेलिया क्रूझच्या मालकीच्या एम व्ही एम्प्रेसचे क्रूझ देखील गोव्यातील बंदरावर आले होते. सकाळी 11 वाजता आलेलं हे जहाज संध्याकाळी 8 च्या सुमारास पुन्हा परतीच्या वाटेवर निघालं. गोव्यात एकाच दिवशी आलेल्या या दोन्ही जहाजांमुळे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर गोव्यातील मुरगाव बंदराचे किती महत्व आहे याची खात्री पटते.

या हंगामात कॉर्डेलियाहून गोव्यातील मुरगाव बंदरावर एकूण 30 जहाजं येण्याची शक्यता आहे. तसेच इतर भागांमधून देखील 14 आंतराष्ट्रीय जहाजं गोव्याला भेट देणार आहेत.

लाल समुद्रात सुरु असलेल्या संघर्षामुळे जहाजांच्या येण्याजाण्यावर काहीसा निर्बंध लागला होता मात्र समोर आलेल्या आकड्यानुसार गेल्यावर्षी गोव्यात येणाऱ्या जहाजांच्या संख्येत वाढ झालीये व एकूण 1.2 लाख प्रवाशांनी गोव्याला भेट दिली होती.

गोव्यातील मुरगाव बंदरावर पुढल्या वर्षापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल सुरु करण्याचा विचार सुरु आहे. आतासाठी मात्र गोव्याला येणारी ही सर्व जहाजं ब्रेकवॉटर बर्थवर थांबतात. येणाऱ्या काळात जर का दर आठवड्याला दोन जहाजं मुरगाव बंदराला येऊन लागली तर लवकरच गोवा भारतातील पश्चिम किनाऱ्यावरील पर्यटनाचे केंद्र बनण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT