Mormugao Port Gate  Dainik Gomantak
गोवा

Mormugao Port: '..प्रसंगी केंद्राची मदत घेऊ'! मुरगाव गेट प्रकरणावरुन तानावडेंचे स्पष्टीकरण

Mormugao Port Gate Issue: हा प्रश्‍‍न केंद्रीय बंदर व जहाजोद्योगमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे नेणार आहोत, असे राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.

Sameer Panditrao

वास्को: येथील उड्डाणपुलाखालील (केबल स्‍टेड पूल) रस्त्याच्या एक्झिट भागात मुरगाव बंदर प्राधिकरणाने लोखंडी गेट उभारल्याप्रकरणी आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी बोललो आहे. प्रसंगी आम्ही हा प्रश्‍‍न केंद्रीय बंदर व जहाजोद्योगमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे नेणार आहोत, असे राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले. सदर उड्डाणपुलाचा वापर स्थानिकांसाठीही झाला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

बायणा येथील रवींद्र भवन ते मुरगाव बंदरदरम्यानच्या उड्डाणपूल तथा केबल स्टेड-पुलाचे लोकार्पण तसेच इतर प्रकल्‍पांचे भूमिपूजन केंद्रीय रस्‍तेवाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. मात्र यावेळी तानावडे दिल्लीत असल्याने या सोहळ्याला उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे बुधवारी गोव्यात परताच त्यांनी सदर पुलाला भेट देऊन पाहणी केली.

याप्रसंगी त्यांच्यासमवेत मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, नगरसेविका श्रद्धा आमोणकर, नगरसेवक दीपक नाईक, रवींद्र भवनाचे अध्यक्ष जयंत जाधव, उपाध्यक्ष डॉ. धर्मेंद्र प्रभुदेसाई, मुरगावचे प्रभारी संतोष केरकर, रवळू पेडणेकर, प्रसाद प्रभुगावकर तसेच कार्यकर्ते उपस्‍थित होते.

पेडणेपासून काणकोणपर्यंतचे सर्व रस्ते चौपदरीकरण व्हावेत यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सतत पाठपुरावा केला आहे. मात्र केंद्रीय यंत्रणा व स्थानिकांमध्ये काही वेळा सुसंवाद होत नाही. त्‍यामुळे अनेकदा वाद होतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांना योग्य मान मिळाला पाहिजे, असेही तानावडे यांनी यावेळी सांगितले.

बायणा रवींद्र भवन ते मुरगाव बंदर यादरम्यानच्या उड्डाणपूल हा गोव्यातील काही चांगल्या प्रकल्पांपैकी एक आहे. मंत्री नितीन गडकरी यांचे गोव्यासाठी नेहमीच सकारात्मक धोरण राहिले आहे. त्यांच्यामुळे गोव्यातील रस्ते व पुलांचे जाळे विणले गेले. या उड्डाणपुलामुळे मुरगाव बंदरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. तसेच लोकांची गैरसोय दूर होईल.
सदानंद शेट तानावडे, राज्यसभा खासदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT