MLA  Dainik Gomantak
गोवा

Mormugao Port Authority: नव्या पुलावरचे 'ते' फाटक उघडेच राहणार, एमपीएचे आश्वासन; स्थानिकांनी व्यक्त केले समाधान

Sada to Varunapuri cable-stayed bridge: फाटक उभारण्यामागे बंदर प्राधिकरणाचा हेतू काय, यासंबंधी उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: मुरगाव बंदर प्राधिकरणाने (एमपीए) उभारलेल्या फाटकाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी एमपीएचे अध्यक्ष डॉ. एन. विनोदकुमार यांची बुधवारी (0५ फेब्रुवारी) दुपारी भेट घेतली. त्यावेळी डॉ. विनोदकुमार यांनी सदर फाटक बंद करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करून ते २४ तास वाहतुकीसाठी उघडे असेल, असे आश्वासन दिले.

उड्डाणपुलाचे लोकार्पण २१ जानेवारीला झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी (ता. २२) मुरगाव बंदर प्राधिकरणाने ते फाटक उभारले होते. त्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला होता. फाटक उभारण्यामागे बंदर प्राधिकरणाचा हेतू काय, यासंबंधी उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

याप्रकरणी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, नगराध्यक्ष गिरीश बोरकर तसेच काही नगरसेवकांनी संताप व्यक्त करताना प्राधिकरणाची दादागिरी सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. ते फाटक तेथून हटविलेच पाहिजे असा पवित्रा आमदार साळकर व इतरांनी घेतला आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष नाईक यांना निवेदन दिल्यावर आज बुधवारी दुपारी मुरगावचे आमदार आमोणकर यांनी मुरगाव मंडळ अध्यक्ष अविनाश नाईक, मुरगावचे भाजप प्रभारी संतोष केरकर, जयंत जाधव यांच्यासह प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विनोदकुमार यांची भेट घेऊन फाटकाचा प्रश्न उपस्थित केला. सदर फाटक स्थानिकांसाठी २४ तास उघडे असेल असे आश्वासन डॉ. विनोद कुमार यांनी दिले. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

१) मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांच्यासह बायणातील रहिवाशांच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावत, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची काल मंगळवारी भेट घेऊन निवेदन दिले होते.

२) या शिष्टमंडळात जयंत जाधव, कृष्णकांत (बाबू) कामत, डॉ. निखिल परुळेकर, श्याम नायक, सुकोर फर्नाडिस, मानू फर्नांडिस यांचा समावेश होता.

३) सदर निवेदनात फाटक उभारण्यामागे प्राधिकरणाच्या हेतूसंबंधी माहिती देण्यात आली. ते फाटक २४ तास उघडे ठेवण्यात येणार असल्यासंबंधी मुरगाव बंदर प्राधिकरणाकडून लेखी आश्वासन मिळाले पाहिजे. तसेच याप्रकरणी प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी जाहीररीत्या वक्तव्य करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली होती.

४) त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला लक्ष घालण्याचे निर्देश दिले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाने यासंबंधी प्राधिकरणाकडून स्पष्टीकरण मागावे अशी विनंती शिष्टमंडळाने केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT