Mormugao Municipalityl |Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: 'म्हादई लढ्याबाबत आमचा सरकारला पाठिंबा'

म्हादई नदीचे पाणी वळवण्याविरुद्धच्या लढ्यात सरकारला पाठिंबा देण्याचा एकमताने संकल्प करणारी मुरगाव नगरपालिका राज्यातील पहिली नगरपालिका ठरली आहे.

दैनिक गोमन्तक

Mormugao Municipality: म्हादई नदीचे पाणी वळवण्याविरुद्धच्या लढ्यात सरकारला पाठिंबा देण्याचा एकमताने संकल्प करणारी मुरगाव नगरपालिका राज्यातील पहिली नगरपालिका ठरली आहे.

नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्स यांनी मुरगाव नगरपालिका म्हादई विषयावर संपूर्ण पालिका कार्यक्षेत्रातील सर्व शाळांमध्ये शिबिरे घेणार आणि 25 प्रभागांमध्ये विशेष जनजागृती उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले.

नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्स म्हणाले, म्हादईबाचावसाठी कार्यरत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास असून आम्हांला खात्री आहे, की म्हादईचे पाणी वळवले जाणार नाही. न्यायव्यवस्थेवरही आमचा पूर्ण विश्वास आहे, जी या वळणावर गोवावासीयांच्या चिंता समजून घेईल.

म्हादई नदी ही आपली जीवनवाहिनी आहे. पाणी वळवल्यास पाण्याची समस्या उद्‍भवू शकते. नगरसेवक सुदेश भोसले म्हणाले, मुरगाव पालिकेने म्हादई समस्येवर शाळांमध्ये मेगा जनजागृती शिबिर घेण्याचा निर्णय घेतला आहे. शाळांतून चित्रकला आणि निबंध स्पर्धा, जनजागृती कार्यक्रम आणि इतर शालेय उपक्रम राबविणार आहोत.

गोव्याची जीवनवाहिनी असलेल्या म्हादई नदीचे पाणी वळवण्याविरुद्धच्या लढ्यात सरकारचे हात बळकट करण्यास आणि शाळांसह अगदी मूलभूत तळागाळात पूर्ण पाठिंबा मिळेल, असा विश्‍वासही यावेळी व्यक्त करण्यात आले.

संकट दूर होईल!

नगरसेविका शमी साळकर म्हणाल्या, म्हादईचा पाणीप्रश्न गेल्या तीस वर्षांपासून गाजत आहे. तथापि, डीपीआरला दिलेली मंजुरी कारणीभूत आहे.

गोव्याची चिंता आहे आणि एक पालिका म्हणून आम्ही ठराव केला आहे, की म्हादई वळवण्याची परवानगी दिली जाऊ नये. मुख्यमंत्री सर्व कायदेशीर, तांत्रिक आणि राजकीय पर्यायांचा शोध घेऊन म्हादईवरील संकट दूर करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT