Mormugao Municipal  Dainik GOMANTAK
गोवा

मुरगाव पालिका फुटपाथवर अतिक्रमणे वाढली

फुलझाडे, कुंड्या विक्रेत्याने आपला व्यवसाय मधोमध थाटला; पालिकेचे दुर्लक्ष

दैनिक गोमन्तक

वास्को: मुरगाव पालिकेसमोर फुटपाथ बळकावल्याने फुल रोपटे विक्री करणाऱ्यापासून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे पालिकेने मात्र विक्रेत्याकडे दुर्लक्ष केल्याने त्याने आपले दुकान कायमस्वरुपी थाटले आहे.

(Mormugao Municipal footpath increased encroachment on)

गेल्या चार-पाच महिन्यापासून येतील पालिकेसमोर एका फुलझाडे, कुंड्या विक्रेत्याने आपला व्यवसाय, मधोमध फुटपातवर थाटूत जागा बळकावली आहे. याला विचारणारे कोण नसल्याने त्यांचा व्यवसाय दिवसेंदिवस तेजीत चालला आहे. पालिकेनेही या विक्रेत्यावर कारवाई करण्याचे धाडस केलेले नाही. कारण अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार या बिगर गोमंतकीय विक्रेत्यांनी पालिकेला झाडे लावून सुशोभीकरण करून देण्याचे सांगितले आहे.

आश्वासनामूळे पालिका कर्मचारी कारवाई करण्यास धजावलेले नाहीत. तसेच विक्रेत्याच्या सांगण्यानुसार मुरगाव पालिकेच्या कर्मचाऱ्यांना हप्ता पोचवत असल्याचे त्याचे म्हणणे आहे. पालिकेकडे स्थानिक व्यावसायिकांनी आपला व्यवसाय केल्यास पालिकेकडून कारवाईस समोर सामोरे जावे लागते असे चित्र आहे.

दुसरीकडे बिगर गोमंतकियांना पालिकेकडून कोणत्याच कारवाईला न जाता मदत करत असल्याने त्यांना याची मदत होते आहे. त्याबद्दल गोमंतकीय व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच अतिक्रमण केलेल्या फुल विक्रेत्याला हटवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT