Mormugao Municipal Council meeting Dainik Gomantak
गोवा

Mormugao Municipal Council: १ कोटी महसुलाचे मुरगाव पालिकेचे ध्येय

Mormugao Municipality: सप्ताह समितीला १ लाख २५ हजार रुपयांची देणगी

गोमन्तक डिजिटल टीम

मुरगाव पालिका मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या विशेष बैठकीत श्री दामोदर भजनी सप्ताहाचे यंदा १२५ वे वर्ष असल्याने पालिकेतर्फे सप्ताह समितीला १ लाख २५ हजार रुपये देणगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या वर्षी सप्ताहातील फेरीतून १ कोटी रुपये महसूल जमा करण्याचे ध्येय ठरवण्यात आले आहे.

नगरसेवक विनोद किनळेकर ऊर्फ पांडे यांनी मांडलेला देणगीचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. हा ठराव मांडल्याबाबत किनळेकर यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच सप्ताह काळात पालिका उद्यानातील तसेच परिसराचा गैरवापर टाळण्यासाठी पालिका उद्यानामध्ये सुरक्षा रक्षक तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच एकेरी वापराच्या प्लास्टिकवर बंदी घालण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

या वर्षी सप्ताहातील फेरीतून १ कोटी रुपये महसूल जमा करण्याचे ध्येय ठरवण्यात आले असून गेल्या वर्षीचा ९८ लाखांचा विक्रम मोडीत काढून पालिका तिजोरीत भर घातली जाईल, असे नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांनी सांगितले.

दरम्यान, सप्ताह काळात वास्कोतील घरे, हॉटेल्स, इमारती आणि कार्यालयांना सप्ताहाच्या १२५ व्या वर्षानिमित्ताने त्यांच्या आवारात रोषणाई करण्याचे आवाहन केले आहे. सप्ताहासाठी पालिका दरवेळी ५० हजार रुपये देणगी देत असे, परंतु या वर्षी १२५ वे वर्ष असल्याने पालिकेतर्फे १ लाख २५ हजार रुपये देण्याचे ठरविले आहे, असे नगराध्यक्ष बोरकर यांनी सांगितले.

निवृत्त कर्मचाऱ्यांची थकबाकी देणार

या बैठकीत पालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची थकबाकी देण्याचा निर्णय घेण्यात आला. पालिकेला आयओसी करोडो रुपये देय होते. ती देय पालिकेला मिळाल्याने पालिकेला दिलासा मिळाला. त्या पैशातून पालिकेने निवृत्त वेतनधारकांची थकबाकी देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे नगराध्यक्ष बोरकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT