मार्केट  Dainik Gomantak
गोवा

भाडेवाढीच्या विरोधात व्यापाऱ्यांकडून मुरगाव मार्केट बंद

निषेध व्यक्त: गाळे धारकांना घ्यावी लागली माघार

दैनिक गोमन्तक

वास्को: इंधन दरवाढीमुळे सामान्य जनता आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाली असताना, मुरगाव नगरपालिकेने मार्केटमधील गाळेधारकांची भाडे पट्टीत वाढ केल्याने सोमवारी संडे मॉडर्न गाळेधारकांनी दुकाने बंद करून निषेध व्यक्त केला. वाढ सर्व नियम पाळून केल्याने माघार घेणे अशक्य असल्याची माहिती पालिका मुख्याधिकारी जयंती तारी व नगराध्यक्ष दामोदर कासकर यांनी सांगितल्याने गाळेधारकांना हिरमुसले होऊन माघार घ्यावी लागली.

मुरगाव नगरपालिकेने गेल्या आठवड्यात गाळेधारकांच्या सोपो भाड्यात दुपटीने वाढ केली आहे. गेल्या दहा वर्षात राज्यातील एकमेव नगरपालिका मुरगाव पालिकेने गाळेधारकांच्या भाडे पट्टीत वाढ केली नाही. मात्र इतर सर्व नगरपालिका गाळेधारकांना भाडे पट्टीत दुपटीने वाढ केली आहे.

वास्को येथील मुरगाव नगरपालिकेने गेल्या आठवड्यात पालिका अंतर्गत येणाऱ्या सर्व गाळेधारकांच्या भाडे पट्टीत पूर्वी पेक्षा दुपटीने वाढ केल्याने गाळेधारकांनी नाराजी व्यक्त करून येथील मॉडन मार्केटमधील गाळेधारकांनी आपली दुकाने सोमवारी (ता.4) बंद ठेवली. गेली दहा वर्षे प्रति 1 चौ. मी. जागेचे भाडे फक्त 5 रुपये होते. ते आता वाढवून 15 रुपये प्रति चौ. मी. केल्याने गाळेधारकांनी आपली दुकाने बंद करून मुरगाव नगरपालिकेसमोर येऊन निषेध व्यक्त केला.

मुख्याधिकारी निर्णयावर ठाम

भाडेपट्टीत वाढ केल्याने मॉडर्न मार्केट पूर्णपणे बंद करून गाळेधारकांनी पालिकेच्या विरोधात निषेध व्यक्त केला व भाडेपट्टीत वाढ करू नये, अशी मागणी केली. मात्र मुरगाव नगरपालिका मुख्याधिकारी जयंत तारी यांनी आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले. यावर गाळेधारकांना नाराज झाले असून वाढत्या महागाईमुळे झालेली भाड परवडणारी नाही, असे त्यांचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजप सरकारचा अहंकार जनता मोडेल! अरविंद केजरीवालांची टीका, कारापूर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा केला निषेध

Section 39A Protest: आता गावागावांतून आंदोलन! कलम '39अ'विरोधात आमदार वीरेश बोरकर यांची घोषणा

खरी कुजबुज: सरकारची अशीही हुशारी!

दणका! वेर्णात वृक्षतोडीला स्थगिती, उच्च न्यायालयाचा निर्णय; तज्ज्ञ समितीकडून पाहणी

Karapur Mega Project Protest: आंदोलकांना पणजीत रोखले; गुन्हे न नोंदविताच सोडले, मेगा प्रकल्पाविरोधात कारापूरवासी एकवटले

SCROLL FOR NEXT